दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तालुक्यातील एक गाव जिथे सर्वच जाती धर्माचे लोक एकत्र राहतात.विचार एक, वेशभूषा एक मात्र एका रस्त्यामुळे दोन्ही गावे विभागली गेली. गाव एकत्र, मात्र कारभार चालतो तो स्वतंत्रपणे, तिल्ली आणि मोहगाव असे हे गावाचे नाव आहे.दीडशे वर्षापूर्वीच हे गाव या ठिकाणी वसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या गावाचा खरा इतिहास माहिती पडू शकला नाही. या अनोख्या गावाची कहाणीही अनोखी आहे.तिल्ली या गावाची लोकसंख्या तीन हजारच्या जवळपास तर मोहगावची लोकसंख्या १८०० आहे. मात्र या गावातील नागरिक तिल्ली-मोहगाव असा भेदभाव न करता आनंदाने राहतात. सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, दंडार यासारखे कार्यक्रमही दोन्ही गावात एकाच दिवशी न ठेवता वेगवेगळ्या तारखेला ठेवतात. हा सामाजिक सलोखा या दोन्ही गावाची जमेची बाजू आहे. गोरेगाववरुन १८ कि.मी.अंतरावर तिल्ली मोहगाव हे गाव वसलेले आहे. चोपावरुन या गावाला गेल्यास गावाच्या सुरुवातीस मोठे प्रवेशद्वार आहे.या प्रवेशद्वारावर ‘सुस्वागतम’आपले स्वागत आहे असे फलक लावण्यात आले आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला विठ्ठल रुखमाईचे मंदिर आहे. पुढे वीस फुटावर मोहगाव येथे दर रविवारी बाजार भरतो. या बाजारात तिल्ली, मोहगाव, गौरीटोला, पळसाळीटोला व इतर जवळपासच्या गावातील महिला-पुरुष खरेदीसाठी येतात.तिल्ली-मोहगाव या दोन्ही गावाला स्वतंत्र ओळख आहे. मात्र या गावात गेल्यावर तिल्ली काय आणि मोहगाव काय, हा भेदभाव कधीच कळला नाही. तालुक्यात तिल्ली नावाचे एकच गाव आहे. पण मोहगाव नावाची दोन गावे असल्यामुळे तिल्लीला सोबत जोडल्याशिवाय नवख्या मानसाला या गावात पोहोचणे अवघडच आहे.घर एक नोंद दोन्ही ग्रामपंचायतकडेतिल्ली-मोहगाव एका रस्त्याने विभागलेले गाव आहे. मात्र एकाच घरातील दोन कुटुंबाची नोंदणी दोन्ही ग्रामपंचायतीकडे आहे. एकाच घराचे दोन भाग पाडून लहानभाऊ तिल्ली ग्रामपंचायतीत तर मोठा भाऊ मोहगाव ग्रामपंचायतीचा रहिवासी आहे.मोहगावमध्ये जिल्हा परिषद शाळाप्रशासनाने मोहगावच्या चिमुकल्यासाठी मोहगावच्या हद्दीत जिल्हा परिषदेची एक ते सातपर्यंत शाळा उघडली आहे. तिल्ली येथे जिल्हा परिषदेची शाळा नाही. त्याठिकाणी एक खासगी शाळा आहे.मात्र मोहगावच्या शाळेत तिल्लीची चिमुकली मुलेही शिक्षण घेतात.रस्त्याचा त्रिवेणी संगमतिल्ली-मोहगाव येथे गेल्यावर कुठेही रस्त्याचे चार जागेवर संगम नाही. येथे रस्त्याचे त्रिवेणी संगम पहायला मिळते. तिल्लीच्या शेतकऱ्यांची शेती मोहगावात तर मोहगावच्या शेतकºयांची शेती तिल्लीत आहे. ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय वगळल्यास दोन्ही गावचे नागरिक तिल्ली-मोहगाव असा भेदभाव न करता हक्काने राहतात.तिल्ली-मोहगाव या गावाने बºयाच परंपरा जपल्या आहेत.निवडणुकीच्या वेळी गावात राजकारण राहते. निवडणूक संपली की राजकारणाचा साधा गंधही या गावात येत नाही. सर्व लोक गुण्यागोविंदाने येथे वास्तव करतात.-रेखलाल गौतम, ग्रा.पं. सदस्य, मोहगाव.
गाव एकत्र मात्र कारभार चालतो स्वतंत्रपणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 9:19 PM
तालुक्यातील एक गाव जिथे सर्वच जाती धर्माचे लोक एकत्र राहतात.विचार एक, वेशभूषा एक मात्र एका रस्त्यामुळे दोन्ही गावे विभागली गेली. गाव एकत्र, मात्र कारभार चालतो तो स्वतंत्रपणे, तिल्ली आणि मोहगाव असे हे गावाचे नाव आहे.
ठळक मुद्देतिल्ली, मोहगाव रस्त्यामुळे विभागली गावे : एका रस्त्याने झाले विभाजन, कार्यक्रमही एकत्रितच