लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संचारबंदीच्या काळात अवैधरित्या दारू गाळणे, विक्री करणे व जुगार खेळणे अशा अवैध धंद्यांवर धाड टाकून ग्रामीण पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले. ३ दिवसांत चार अवैध दारू विक्रेत्यांकडून दारू व दारू गाळण्याचे साहित्य असा ७० हजार ५० रूपयांचा माल जप्त केला आहे.ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी ग्राम आसोली येथील गौतम देवानंद बंसोड (४८) याच्या दारू गाळण्याच्या ठिकाणी धाड घातली असता तेथे चार प्लास्टीक ड्रम किंमत चार हजार रपये, २२० किलो मोहफुल किंमत १५ हजार ४०० रूपये, एक लोखंडी ड्रम किंमत ५०० रूपये, एक जर्मन घमेला किंमत एक हजार असा एकूण २० हजार ९०० रूपयांचा माल मिळून आला असून पोलिसांनी जप्त केला. २१ एप्रिल रोजी ग्राम पांढराबोडी येथील लिखनलाल टेकलाल दमाहे (३२) याच्याकडून हातभट्टीची ७० लीटर दारू किंमत सात हजार रूपये जप्त करण्यात आली. २२ एप्रिल रोजी फुलचूर येथील शेतात छनिलाल धनलाल बघेले (३७) हा दारू गाळ असताना पोलिसांनी धाड घालून हातभट्टीची १५ लीटर दारू व मोबाईल किंमत एक हजार रूपये असा एकूण दोन हजार ५०० रूपयांचा माल जप्त केला.२२ एप्रिल रोजी नागरा येथील चिमन रामकिशन नेवारे (५७) हा शेतात मोहफुलाची दारू गाळत असताना ३२० किलो मोहफुल किंमत ३२ हजार रूपये, ११ प्लास्टीक ड्रम किंमत चार हजार ४०० रूपये, एक जर्मन करची किंमत दोन हजार रूपये, दोन नग लोखंडी ड्रम किंमत एक हजार रूपये, चार नग पिपे किंमत १०० व इतर साहित्य असा एकूण ३९ हजार ६५० रूपयांचा माल पोलिसांनी जप्त केला.
ग्रामीण पोलिसांनी चार दारूभट्या उधळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 5:00 AM
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी ग्राम आसोली येथील गौतम देवानंद बंसोड (४८) याच्या दारू गाळण्याच्या ठिकाणी धाड घातली असता तेथे चार प्लास्टीक ड्रम किंमत चार हजार रपये, २२० किलो मोहफुल किंमत १५ हजार ४०० रूपये, एक लोखंडी ड्रम किंमत ५०० रूपये, एक जर्मन घमेला किंमत एक हजार असा एकूण २० हजार ९०० रूपयांचा माल मिळून आला असून पोलिसांनी जप्त केला.
ठळक मुद्दे३ दिवसांतील कारवाई : ७० हजारांचे साहित्य केले जप्त