निलकंठ भुते।लोकमत न्यूज नेटवर्कचिरचाळबांध : नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचयतची आहे. मात्र पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठ्यासाठी नळाची पाईप लाईन चक्क नालीत असल्याने गावकऱ्यांना गढूळ आणि दूषीत पाणी प्यावे लागत आहे. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात असून यावर वेळीच उपाय योजना केली नाही तर या गावात साथरोगांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आमगाव तालुक्यातील शिवणी गावाला बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. ४७ गावांसाठी असलेल्या या पाणी पुरवठा योजनेतून लोकांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून दिले जाते. परंतु शुध्द होऊन आलेले तेच पाणी शिवणी येथील गावकऱ्यांना गढूळ व दूषीत होऊन मिळते. ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारामुळे हा प्रकार सुरू असल्याचे बोलल्या जाते. कधी-कधी ते पाणी गावकऱ्यांना मिळत देखील नाही.या गावात सुध्दा टिल्लू पंपाची समस्या असल्याने अनेक गावकऱ्यांना नळाचे पाणीच मिळत नाही. पिण्यापुरते तरी पाणी मिळावे यासाठी महिलांना नालीमधून गेलेल्या नळ कनेक्शनमधून पाणी भरावे लागत आहे.सद्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने पावसाचे पाणी रस्त्याच्या ज्या नाल्यांमधून वाहून जाते त्या नाल्यांमधूनच पिण्याचे पाणी भरावे लागते.नालीतून पाणी काढतांना अनेकदा नालीतील पाणी त्या पाण्याच्या भांडामध्ये जाते, पाऊस सुरू असल्यास तर पाणी भरण्यासाठी फारच बिकट स्थिती असते. नालीतील घाण पाण्यामुळे शिवणी येथील गावकºयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.यासंदर्भात अनेकदा ग्रामपंचायतला गावकऱ्यांनी तक्रारी दिल्यात परंतु त्याची अद्यापही दखल घेतली नसल्याचा आरोप आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून या प्रकारामुळे गावकऱ्यांना साथरोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.टिल्लू पंपाद्वारे घेतात पाणीशिवणी या गावात १५९ नळ कनेक्शनधारक आहेत.त्यापैकी १९ नळ कनेक्शन धारकांनी नळाचे अधिक पाणी घेण्यासाठी नळाला टिल्लूपंप बसविले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे टिल्लू पंप नाही अश्या लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. पैसे मोजूनही पिण्याच्ंो पाणी शिवणीवासीयांना मिळत नाही. ज्यांनी नळाला पंप लावले त्यांची माहितीही ग्रामपंचायतला आहे.परंतु त्यांच्यावर कसलीही कारवाही आत्तापर्यंत करण्यात आली नाही.मीटर झाले गायबगावकºयांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेणे आवश्यक आहे. नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतचा खटाटोप असतो. परंतु शुध्द पाण्याला गढूळ पाण्याच्या स्वरूपात नागरिकांना पुरवठा होत असल्याचा प्रकार शिवणी गावात पाहायला मिळत आहे. सर्व नळ कनेक्शन धारकांना पिण्याचे पाणी मिळावे. जो जेवढे पाणी वापरेल तेवढे त्याला बिल द्यावे लागेल म्हणून शिवणी येथे प्रत्येक नळाला मीटर बसविण्यात आले होते. परंतु नळांचे मीटर गायब झाले आहेत.प्रत्येक नागरिकाला शुध्द पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतने टिल्लू पंप लावणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी तक्रार देऊनही लोकांवर कारवाई करण्यात आली नाही.- ग्यानिराम हत्तीमारे,तंटामुक्त अध्यक्ष शिवणी.ग्रामपंचायतच्या उदासीनतेमुळे पाण्यात जंतू झालेल्या पाण्याचा पुरवठा शिवणी येथील गावकºयांना करण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतला माहिती देऊनही कुठलीच उपाय योजना करण्यात आली नाही.-विलास गायधने,नागरिक शिवणी.
शिवणी येथील गावकरी पितात दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 11:40 PM
नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचयतची आहे. मात्र पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठ्यासाठी नळाची पाईप लाईन चक्क नालीत असल्याने गावकऱ्यांना गढूळ आणि दूषीत पाणी प्यावे लागत आहे. यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात असून यावर वेळीच उपाय योजना केली नाही तर या गावात साथरोगांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठळक मुद्देगावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात : ग्रामपंचायतचे दुर्लक्ष, साथ रोगांचा उद्रेक होण्याची शक्यता