शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

पहिल्या दिवशी पालन अन्‌ दुसऱ्या दिवशीच उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:19 AM

गोंदिया : काेरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपासून (दि.२८) नवीन निर्बंध लागू करण्यात ...

गोंदिया : काेरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपासून (दि.२८) नवीन निर्बंध लागू करण्यात आले. यानुसार जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश काढण्यात आले. पहिल्याच दिवशी शहरातील सर्वच व्यावसायिकांनी याचे पालन केले. मात्र, मंगळवारी दुसऱ्याच दिवशी बाजारपेठेतील बहुतेक दुकाने सायंकाळी ४.४५ वाजतापर्यंत सुरूच होती. त्यामुळे पहिल्या दिवशी पालन अन्‌ दुसऱ्या दिवशी उल्लंघन असेच चित्र होते.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. दुसरी लाट देखील पूर्णपणे ओसरली आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा अनलॉकच्या लेव्हल वनमध्ये समावेश होता. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट अर्ध्या टक्क्याच्या आतच आहे. सुदैवाने डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या एकाही रुग्णाची नोंद जिल्ह्यात झाली नाही, ही निश्चितच समाधानकारक बाब आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू नये यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात निर्बंध लागू केले आहेत. याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना नगर परिषद, महसूल आणि पोलीस विभागाला केल्या आहेत. सोमवारी पहिल्या दिवशीच दुपारी ४ वाजता पोलिसांनी बाजारपेठेत फिरून वेळेत दुकाने बंद करण्यास व्यापाऱ्यांना सांगितले. त्यामुळे पहिल्या दिवशी नियमांचे पालन झाले. हेच चित्र यापुढे देखील कायम राहील अशी अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी नियमांना धाब्यावर बसविल्याचे चित्र होते.

.............

पोलीस पथक झाले गायब

डेल्टा प्लसच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून (दि.२८) कडक निर्बंध लागू करण्याचे पत्र काढले. त्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषद, पोलीस आणि महसूल विभागावर जबाबदारी निश्चित करून दिली. पहिल्या दिवशी पोलीस पथकाने शहरातील बाजारपेठेत फिरून नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी हे पथक गायब झाल्याने दुकाने सायंकाळी ४.४५ पर्यंत सुरूच होती.

................

नगर परिषदेला पडला कारवाईचा विसर

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या ग्राहक आणि व्यावसायिकांवरसुद्धा कारवाई करण्याचे निर्देश दिले. नगर परिषद आणि महसूल विभागाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात होती, पण दोन दिवसांपासून नगर परिषदेलासुद्धा कारवाई करण्याचा विसर पडल्याचे चित्र आहे.

............

दासगाव येथे आठवडी बाजार सुरूच

जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढले आहे. मात्र, यानंतर गोंदिया तालुक्यातील दासगाव येथे मंगळवारी आठवडी बाजार सुरू होता.