सालेकसा : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी सालेकसा तालुक्यातील पुरग्रस्त भागाचा दौरा करुन नुकसानग्रस्त घरांची व शेतातील पिकांची पाहणी केली. दौरा संपल्यानंतर आ. पुराम यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. तसेच प्रशासकीय स्तरावर योग्य कार्यवाही करुन फटका बसलेल्या लोकांना मदत मिळावी यासाठी अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या दौऱ्यामध्ये तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, भाजप तालुका अध्यक्ष परसराम फुंडे, माजी पं.स. सभापती बाबुलाल उपराडे, शंकर मडावी, इसराम बहेकार, खेमराज लिल्हारे, मेहतर दमाहे, दिनेश शर्मा, राजेंद्र बडोले, मनोज बोपचे, हेमराज सुलाखे, लक्ष्मण सोनसर्वे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले.दिवसभर चाललेल्या दौऱ्यामध्ये आमदार पुराम आणि त्यांच्या चमूने तालुक्यातील झालीया, साकरीटोला, सोनपुरी, खेडेपार, कुंभारटोला, रोंढा, आमगाव खुर्द, नानव्हा, घोन्सी, दरबडा, भरीटोला, ठबरुटोला, डहाराटोला, दल्लाटोला, कोपालगड, गोर्रे, लोहारा, बिजेपार या गावांना भेट देवून पिकांची व क्षतिग्रस्त घरांची पाहणी केली. (वार्ताहर)
पुराम यांची पुरग्रस्त भागाला भेट
By admin | Published: September 17, 2016 2:13 AM