शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

व्हीएनआयटी करणार स्ट्रक्चरल आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 8:36 PM

येथील सिव्हिल लाईन परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचा (बीजीडब्ल्यू) कारभार ८० जुन्या जीर्ण इमारतीतून सुरू आहे. तर मागील तीन वर्षांपासून या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले नव्हते. यामुळे या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात आला होता.

ठळक मुद्देपालकमंत्र्याचे निर्देश : बांधकाम विभाग लागला कामाला, रुग्णालयाचा परिसर करा निटनेटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील सिव्हिल लाईन परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचा (बीजीडब्ल्यू) कारभार ८० जुन्या जीर्ण इमारतीतून सुरू आहे. तर मागील तीन वर्षांपासून या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट झाले नव्हते. यामुळे या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. लोकमतने ही धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर शासन आणि प्रशासनाने याची गांर्भियाने दखल घेतली. तसेच बीजीडब्ल्यू रुग्णालयाचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे काम नागपूर येथील व्हिएनआयटी संस्थेकडे सोपविण्याचे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. लवकरच या कामाला सुरूवात केली जाणार आहे.बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या महिला वार्डात पावसाचे पाणी साचल्याच्या घटनेतंतर लोकमतने हा मुद्दा लावून धरला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य प्रशासन यांचा भोंगळ कारभार पुढे आणला. बीजीडब्ल्यू रूग्णालयाची इमारत १९३९ मध्ये उभारण्यात आली. आता या इमारतीला ८० पूर्ण झाले असून ही इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे या इमारतीचे दरवर्षी स्ट्रक्चर आॅडिट करणे आवश्यक होते. त्यामुळे रुग्णालयाची इमारत वापर करण्यायोग्य आहे किंवा नाही, याची माहिती मिळण्यास मदत होते. मात्र बीजीडब्ल्यू प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला ११ पत्र दिल्यानंतरही मागील तीन वर्षांपासून इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केले नव्हते. त्यामुळे इमारतीच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला होता. लोकमतने बीजीडब्ल्यूच्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट व इतर मुद्दे लावून धरल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गांर्भियाने दखल घेत यावरुन जिल्हा प्रशासनाला फटकारले. तसेच दोन दिवसांपूर्वी बीजीडब्ल्यू आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विविध समस्यांवर नागपूर येथे बैठक घेतली. त्यानंतर पालकमंत्री बडोले यांनी याच मुद्दावर शुक्रवारी (दि.१३) नागपूर येथे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील बांधकाम टप्प्या-टप्प्याने करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व बीजीडब्ल्यू रु ग्णालयाची इमारत जीर्ण झाली असल्याने त्याचे भविष्याच्या दृष्टीने स्ट्रक्चरल आॅडिट करणे आवश्यक आहे. बांधकाम विभागाने जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिटचा प्रस्ताव व्हीएनआयटीला दिला आहे. या प्रस्तावावर निर्णय झाल्यानंतर रु ग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. आरोग्य सुविधा ही अत्यावश्यक सेवा असल्याने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विस्ताराला मंजूरी देण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालय परिसरात रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाची व्यवस्था, संरक्षण भिंत आदी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कामांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्री बडोले यांनी दिले.केरकचऱ्याची त्वरित विल्हेवाट लावाबीजीडब्ल्यू रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच काही अनावश्यक वस्तू देखील आवारात पडल्या आहेत. त्यामुळे रुग्णालय परिसरात केरकचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हा सर्व केरकचरा आणि अनावश्यक वस्तूंची त्वरीत विल्हेवाट लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कांदबरी बलकवडे यांनी दिले.बांधकामाची गती वाढवागोंदिया येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर त्याचा कारभार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीत सुरू आहे. या दोन्ही रुग्णालयाच्या परिसरात वैद्यकीय महाविद्यालयासाठी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. मात्र या बांधकामाची गती फार मंद असल्याने कामकाजात अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे बांधकामाची गती वाढवून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.मान्यतेवर संकटमेडीकल कॉन्सिल आॅफ इंडियाच्या निकषानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी ज्या आवश्यक सोयी सुविधा पाहिजे, त्या अद्यापही पूर्ण करण्यात आल्या नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात या आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन न दिल्यास मेडीकल कॉन्सिल आॅफ इंडियाकडूृन मान्यता मिळण्यास अडचण निर्माण होवू शकते. त्यामुळे आरोग्य विभागसुध्दा जोमाने कामाला लागला आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल