शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

मधूर वाणी, प्रेमाच्या बळावर इंदूर स्वच्छतेत देशात नं. १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 9:55 PM

मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी असलेल्या इंदूर शहराने इतिहासात सुवर्ण अक्षराने आपले नाव कोरले. देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ शहराचा मान सलग दोन वर्ष या शहराने पटकावला. मधुर वाणी आणि प्रेमाच्या बळावर तब्बल ३२ लाख नागरिकांची मने जिंकण्याचे काम ‘इंदूर नगर निगम’ म्हणजेच महापालिकेने केले.

ठळक मुद्देअफाट इच्छाशक्ती : ३२ लाख नागरिकांचे पाठबळ मिळविले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी असलेल्या इंदूर शहराने इतिहासात सुवर्ण अक्षराने आपले नाव कोरले. देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ शहराचा मान सलग दोन वर्ष या शहराने पटकावला. मधुर वाणी आणि प्रेमाच्या बळावर तब्बल ३२ लाख नागरिकांची मने जिंकण्याचे काम ‘इंदूर नगर निगम’ म्हणजेच महापालिकेने केले.मागील काही वर्षांमध्ये हे शहर अतिशय गलिच्छ होते. शहरात आलेल्या पाहुण्यांना एक दिवसही थांबावे वाटत नव्हते. महापालिकेला भ्रष्टाचाराची वाळवी लागली होती. तिजोरीवर अक्षरश: दरोडे पडत होते. इतर शहरांप्रमाणेच नागरिकांचा तेथील महापालिकेवरील विश्वास उडाला होता. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत मिशन’या योजनेच्या पहिल्याच वर्षी इंदूरचा देशभरात १४९ वा क्रमांक आला होता. याला महापालिकाच जबाबदार होती. अशा दयनीय अवस्थेत मध्यप्रदेश शासनाने १९९७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले मनीष सिंह यांची ३० मे २०१५ रोजी इंदूर महापालिका आयुक्त म्हणून नेमणूक केली. त्यांच्या नियुक्तीपूर्वीच आमदार मालिनी गौड जनतेतून महापौर म्हणून निवडून आल्या होत्या. महापालिकेत रुजू होताच आयुक्त मनीष सिंह यांनी महापौरांची परवानगी घेऊन शहर स्वच्छ, सुंदर आणि देशात प्रथम क्रमांकावर आणण्याची इच्छा व्यक्त केली.महापौरांनीही परवानगी दिली. राजकीय हस्तक्षेप अजिबात चालणार नाही, असेही आयुक्तांनी ठणकावून सांगितले. इंदूरला देशात प्रथम क्रमांक मिळवून द्यायचा असेल तर त्रिसूत्रीवर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिले म्हणजे शहर कचराकुंडीमुक्त करणे, दुसरे सर्वच रस्त्यांवर असलेल्या धूळ-कणांना हद्दपार करणे आणि तिसरे प्रत्येक घरातून कचरा जमा करणे. या अवघड कामाचा धनुष्य त्यांनी पेलला.दोन वॉर्डांमध्ये पायलटप्रकल्पशहरातील दोन वॉर्ड पायलट प्रकल्प म्हणून निवडण्यात आले. या वॉर्डातील कचराकुंड्या गायब करण्यात आल्या. शंभर टक्के डोअर- टू- डोअर कचरा कलेक्शनवर भर देण्यात आला. हा प्रकल्प राबवीत असताना नागरिकांची मानसिकता, क्षणाक्षणाला येणाऱ्या अडचणींचा आयुक्त स्वत: अत्यंत बारकाईने अभ्यास करीत होते. जागेवरच या अडचणी सोडविण्यावर त्यांचा सर्वाधिक कल होता. नगरसेवक, सामाजिक संघटना, शालेय विद्यार्थी यांच्या मदतीने दोन्ही वॉर्ड कचरामुक्त करण्यात आले. या दोन वॉर्डाने संपूर्ण महापालिकेला शहर स्वच्छ होईल, असा विश्वास दिला.‘कभी महक की तरह हम गुलों से उड़ते हैं,कभी धुएं की तरह पर्वतों से उड़ते हैंये केचियाँ हमें उड़ने से खाक रोकेंगी,की हम परों से नहीं हौसलों से उड़ते हैं’हा राहत इंदौरी यांचा शेर डोळ्यासमोर ठेवून महापालिकेने अखेर गगनभरारी घेण्याचा निर्णय घेतला.भ्रष्ट कंपनीची हकालपट्टीआयुक्त मनीष सिंह यांनी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला. या यंत्रणेतील भ्रष्टाचाऱ्यांना टार्गेट केले. शहरातील कचरा जमा करणाऱ्या ‘ए-टू-झेड’कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले. कंपनी वाहनांमध्ये माती-कचरा भरून दररोज ७००-८०० मेट्रिक टन कचरा उचलल्याचा दावा करीत होती. कंपनीसोबत हातमिळवणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही कर्तव्याची जाणीव करून देण्यात आली. आयुक्त स्वत: सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत रस्त्यांवर फिरून काम करू लागले. त्यामुळे कुंभकर्णी झोपेत असलेली संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली.