लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्टÑीय सेवा योजना, राष्टÑीय विद्यार्थी सेना, नेहरू युवा केंद्र व अखिल भारतीय बापू युवा संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी व्यसनमुक्ती कार्यक्रमांनी व्यसनमुक्ती सप्ताह साजरा करण्यात आला. यात नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील राष्टÑीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जनजागृती रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश दिला.व्यसनमुक्ती सप्ताहाची सांगता नमाद महाविद्यालयात करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रजनी चतुर्वेदी होत्या.याप्रसंगी प्रामुख्याने नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक धरमपाल धुवारे, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. बबन मेश्राम, एनसीसी कमांडर प्रा.एच.पी. पारधी, प्रा. रवी रहांगडाले, अॅड. योगेश अग्रवाल, योग प्रशिक्षक कावळे उपस्थित होते.या वेळी विद्यार्थी व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. संचालन वंशिका शर्मा हिने केले. आभार आकाश नागपुरे याने मानले. कार्यक्रमासाठी रितू मेश्राम, पूजा ठाकरे, संगीता भुरे, मनिषा मरस्कोल्हे, सीमा राऊत, माधुरी डोंगरे, काजल डोंगरे, शीतल नेवारे, भाग्यश्री पटले, दुर्गा बेले, पूनम ठाकरे, पूजा गौतम, प्रगती चिखलोंढे, पायल चौरे, श्वेता रामटेके, शारदा नागपुरे, मोना किरणापुरे, नंदिनी कापसे, रोशनी गभने, डिलेश्वरी मेश्राम, अनिता बावणकर, समीर गडपायले, सविता ठाकरे, सपना जैतवार, अश्विनी मडामे, रागिनी वंजारी, आचल हुड यांच्यासह एनसीसी व एनएसएसच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
स्वयंसेवकांनी दिला व्यसनमुक्तीचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:34 AM
राष्टÑीय सेवा योजना, राष्टÑीय विद्यार्थी सेना, नेहरू युवा केंद्र व अखिल भारतीय बापू युवा संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी व्यसनमुक्ती कार्यक्रमांनी व्यसनमुक्ती सप्ताह साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देठिकठिकाणी व्यसनमुक्ती कार्यक्रमांनी व्यसनमुक्ती सप्ताह साजरा करण्यात आला.