लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून भंडारा-गोंदिया मतदार संघातील १८ लाख ८ हजार ९४८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. लोकशाहीच्या उत्सवासाठी मतदार राजा सज्ज झाला असून निवडणुकीसाठी प्रशासनाने सुध्दा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. बुधवारी विधानसभा निहाय मुख्यालयातून पोलिंग पार्टी नियुक्त मतदान केंद्रावर रवाना झाले आहे. १३ हजार मनुष्यबळाच्या मदतीने ही निवडणूक पार पडणार आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात २ हजार १८४ मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. तर नक्षल प्रभावीत भागात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघात १८ लाख ८ हजार ९४८ मतदार असून त्यात नऊ लाख पाच हजार ४९० पुरुष आणि नऊ लाख तीन हजार ४५८ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथक बुधवारी रवाना झाले. गोंदिया विधानसभा मतदार संघाचे पोलिंग पार्टीला मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. पार्थ सारथी मिश्रा, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष चौधरी यांनी मतदान साहित्य देवून रवाना केले. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय धार्मिक, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, तहसीलदार भांडारकर, उपस्थित होते.गोंदियाप्रमाणेच, अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रासाठी पोलींग पार्टी साहित्य घेऊन रवाना झाले. निवडणूक साहित्य ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम तयार करण्यात आले असून त्याठिकाणी पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे.मतदान करणे केवळ हक्क नसून कर्तव्य आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करण्याचा संकल्प करावा. लोकसभेसाठी पाच वर्षातून एकदा येणाऱ्या मतदानाच्या संधीचे मतदान करून सोने करा व लोकशाही बळकट करण्यासाठी योगदान द्या असे आवाहन मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ.पार्थसारथी मिश्रा व जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. गुरुवार ११ एप्रिलला मतदान आटोपल्यानंतर सर्व मतदान यंत्र स्ट्राँग रुपमध्ये कडक बंदोबस्तात ठेवली जाणार आहेत.दिव्यांगासाठी सुविधानिवडणूक आयोगाने महिला व दिव्यांगासाठी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध केल्या आहे. दिव्यांगासाठी रॅम्प, व्हिलचेअर, पिण्याचे पाणी, शौचालय व बसण्याची सुविधा राहणार आहे. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. उन्हापासुन बचाव करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.१३ हजार मनुष्यबळ सज्जनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने पुरेशे मनुष्यबळ नियुक्त केले आहे. भंडारा जिल्ह्यात १२२१ मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून ६२६० अधिकारी-कर्मचारी तर गोंदिया जिल्ह्यासाठी ९७३ मतदान केंद्रावर ४२७९ अधिकारी-कर्मचारी नेमण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामासाठी सहाही विधानसभा मतदार संघात पोलिसांसह १३ हजार २९२ अधिकारी-कर्मचारी तैनात राहणार आहेत.सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची वेळमतदानासाठी सुटीलोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सुटी जाहीर करण्यात आली आहे. आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. सुटी ही मतदान करण्यासाठी असून आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतरच अन्य कामासाठी जावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे.मतदान करण्याचे प्रशासनाचे आवाहनमतदारांनी जास्तीत जास्त व शांततेत मतदान करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता शाहू, सहाय्यक निवडणूृक निर्णय अधिकारी सुभाष चौधरी यांनी केले.सखी व आदर्श मतदान केंद्रनिवडणुकीसाठी प्रत्येक तालुक्यात महिला व्यवस्थापीत मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील भंडारा, साकोली, तुमसर क्षेत्रात सात तर गोंदिया जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर महिला राहणार आहे. या केंद्रावरील संपूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचारी सांभाळणार आहे. प्रत्येक तालुक्यात एक आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.
लोकशाहीच्या उत्सवासाठी मतदार राजा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 10:23 PM
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात गुरुवार ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून भंडारा-गोंदिया मतदार संघातील १८ लाख ८ हजार ९४८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. लोकशाहीच्या उत्सवासाठी मतदार राजा सज्ज झाला असून निवडणुकीसाठी प्रशासनाने सुध्दा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे.
ठळक मुद्देआज मतदान : १८ लाख मतदार बजावणार हक्क, पोलिंग पार्टी रवाना, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात २१८४ मतदान केंद्र