लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषद रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपले संपूर्ण जीवन गोंदिया नगर परिषदेच्या सेवेसाठी खर्ची घातले. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना स्थायी कर्मचाऱ्यांच्या दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे प्रामाणिकपणे प्रयत्न केले. त्याला यश आले असून नगर परिषदेतील ४७ रोजंदारी कर्मचारी स्थायी झाल्याचे प्रतिपादन आ.गोपालदास अग्रवाल यांनी येथे केले.नगर परिषद रोजंदारी कर्मचाऱ्यांतर्फे आ.गोपालदास अग्रवाल यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जहीर अहमद, रामेश्वर वाघमारे, नसित अल्ली सैय्यद, दीपक रोडे, विश्वनाथ घुगे, सुरेंद्र बन्सोड, नरेंद्र तिवारी, दिलीप चाचिरे, राजेश शर्मा, राजेश टेंभुर्णे, जितेंद्र वैष्णव, गणेश भेलावे, किशोर वर्मा, किशोर उके, योगेश वर्मा, सुनील घोडमारे, राजेश राणा, वसंत वैद्य, दिगंबर पाटील, रंजित कनोजे, प्रभुदास घोडमारे, राजेश राणा, वसंत वैद्य, बेनिराम सोनवाने, पुरूषोत्तम रहांगडाले, राजू लिल्हारे, बुधराम निमजे, उमेंद्र दीप, सुनिता श्रीवास, सीमा रहांगडाले उपस्थित होते.अग्रवाल म्हणाले, ७ वी पेक्षा कमी शिक्षण असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत स्थायी करण्यासाठी सुध्दा शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. गोंदिया नगर परिषदेच्या स्थायी झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना पूर्व विदर्भात ठिकठिकाणी नियुक्ती करण्यात येणार आहे.बन्सोड म्हणाले, आ.अग्रवाल यांच्याच पाठपुराव्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळाला. त्यांचे सहकार्य नेहमीच रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळत आहे. न.प.रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत स्थायी करण्यात यावे, यासाठी सर्व राजकीय पक्षांकडे पाठपुरावा केला. मात्र आ.अग्रवाल यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडे प्रामाणिकपणे पाठपुरावा केल्याचे सांगितले.यावेळी नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने आ.अग्रवाल यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले.
प्रामाणिक प्रयत्नांमुळे रोजंदारी कर्मचारी स्थायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:41 AM
नगर परिषद रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपले संपूर्ण जीवन गोंदिया नगर परिषदेच्या सेवेसाठी खर्ची घातले. त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना स्थायी कर्मचाऱ्यांच्या दर्जा मिळावा यासाठी शासनाकडे प्रामाणिकपणे प्रयत्न केले.
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : न.प. कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार