शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

रोजंदारी कर्मचाऱ्यांची लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 9:27 PM

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन १९९३ पूर्वी पासून नगर परिषद कार्यालयात स्थायी होण्याची आशा बाळगून सेवा देत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना हे वर्ष भरभराटीचे लागले आहे. कारण, नगर परिषदेतील ६० रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेच्या आधारावर स्थायी करण्याचे आदेश नगर विकास विभागाने काढले आहे. यामुळे नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांची एकप्रकारे लॉटरीच ...

ठळक मुद्दे६० कर्मचारी होणार स्थायी : नगर विकास विभागाने काढले आदेश

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन १९९३ पूर्वी पासून नगर परिषद कार्यालयात स्थायी होण्याची आशा बाळगून सेवा देत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना हे वर्ष भरभराटीचे लागले आहे. कारण, नगर परिषदेतील ६० रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठतेच्या आधारावर स्थायी करण्याचे आदेश नगर विकास विभागाने काढले आहे. यामुळे नगर परिषदेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांची एकप्रकारे लॉटरीच लागली आहे.येथील नगर परिषद कार्यालयात सुमारे १७१ रोजंदारी कर्मचारी कार्यरत असून आपल्या जीवनातील महत्वाचे वर्ष त्यांनी नगर परिषद सेवेत गमावले आहे. भविष्यात कधीतरी स्थायी सेवेत कायम केले जाणार ही आशा बाळगून ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत. रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी सेवेत कायम करण्याच्या मागणीला नगर परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष जहीर अहमद व नगरसेवक शकील मंसुरी यांनी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्याकडे विषय मांडला होता. यावर सन २००६ पासून आमदार अग्रवाल राज्य शासनापुढे हा विषय पुरजोरपणे मांडत आले आहेत.रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या या विषयाला घेऊन आमदार अग्रवाल यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर व अन्य अधिकाऱ्यांसोबत कित्येकदा बैठक घेतली. मात्र आतापर्यंत या विषयात काहीच कारवाई केली जात नसल्याचे बघत आमदार अग्रवाल यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान ३ जानेवारी रोजी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हैसकर व अन्य अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आमदार अग्रवाल यांनी हा विषय मांडून त्याचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली. यावर म्हैसकर यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे निर्देश दिले होते.अखेर त्याची पूर्तता करीत ६० रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात वर्ग-३ च्या ३७ तर वर्ग-४ च्या २३ रोजंदारी कर्मचाऱ्यांचे गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा तसेच भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी व तुमसर नगर परिषद कार्यालयांतील मंजूर स्थायी रिक्त पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार समावेशन केले जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाने रोजंदारी कर्मचाऱ्यांची एकप्रकारे लॉटरीच लागली असून त्यांचे भविष्य आता सवरले आहे. शिवाय, यामुळे उर्वरीत रोजंदारी कर्मचाऱ्यांतही आता स्थायी होण्याची एक आशा नव्याने निर्माण झाली आहे.असे होणार समावेशनरोजंदारी कर्मचाऱ्यांना गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नगर परिषदांत समावेश करण्याचे आदेश आहे. आता त्यानुसार, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा नगर परिषदमध्ये उपलब्ध होणाऱ्या वर्ग-३ च्या २० स्थायी रिक्त पदांवर २० कर्मचाऱ्यांचे व पवनी येथे २ पदांवर, तुमसर येथे १० पदांवर व भंडारा नगर परिषद येथे ५ पदांवर रोजंदारी कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात येणार आहे. त्याचप्रकारे, गोंदिया नगर परिषद अंतर्गत पदोन्नती प्रक्रीया पूर्ण करून उपलब्ध होणाऱ्या वर्ग-४ च्या १७ पदांवर व भंडारा जिल्ह्यातील पवनी, तुमसर व भंडारा नगर परिषदेत प्रत्येकी २ प्रमाणे वर्ग-४ च्या ६ पदांवर वर्ग-४ च्या २३ रोजंदारी कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यात येणार आहे.उर्वरितांसाठी लवकरच आदेश आणणारनगर परिषदेतील सुमारे १७१ रोजंदारी कर्मचाऱ्यांचा हा विषय असून यातील ६० कर्मचाऱ्यांना स्थायी सेवेत घेण्याचे आदेश सध्या काढण्यात आले आहेत. त्यामुळे उर्वरीत कर्मचाऱ्यांत एक शंका निर्माण झाली आहे. मात्र उर्वरीत कर्मचाऱ्यांनाही स्थायी सेवेत समाविष्ट करण्यासाठीचे प्रयत्न सुरू असून लवकरच त्यांचेही आदेश आणणार असल्याचे आमदार अग्रवाल यांनी कळविले आहे.