लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मागील सात महिन्यापासून रेल्वेची प्रवाशी वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प होती. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर सुध्दा शुकशुकाट कायम होता. कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात येत असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने काही गाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील चहल पहल थोडी वाढली आहे.शनिवारपासून (दि.१०) विदर्भ एक्सप्रेस सुरू झाली असून पहिल्याच जवळपास तिनशे तिकिटांची विक्री झाली.हावडा_मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक महत्त्वपूर्ण स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशे प्रवाशी गाड्या धावत होत्या. गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याला लागून असल्याने या रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजार प्रवाशी ये_जा करतात. तर रेल्वेच्या मालवाहतुकीच्या दृष्टीने सुध्दा हे रेल्वे स्थानक सर्वाधिक उत्पन्न देणारे आहे.पण मार्च महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रेल्वेची प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मागील सात महिन्यापासून मालगाड्या आणि काही विशेष प्रवाशी गाड्या वगळता इतर सर्व प्रवाशी गाड्यांची वाहतूक ठप्प होती. गोंदिया-मुंबई (विदर्भ एक्सप्रेस) आणि गोंदिया-कोल्हापूर (महाराष्टÑ एक्सप्रेस) या दोन्ही गाड्या गोंदिया रेल्वे स्थानकावर सुटत असल्याने या गाड्यांच्या माध्यमातून रेल्वेला सुध्दा चांगला महसूल प्राप्त होत होता. पण कोरोनामुळे तो सुध्दा बुडाला.शनिवारी प्रथमच मुंबईहून विदर्भ एक्सप्रेस ही गोंदिया येथे पोहचली. यात गोंदिया येथील ३५ प्रवाशी आले. तर परत ही गाडी मुंबईसाठी रवाना झाली. त्यासाठी सुध्दा तिनशेवर तिकिटांची विक्री झाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.सुरक्षाविषयक काळजीकोरोनाचा संसर्ग लक्षात घेता फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी गोंदिया रेल्वे स्थानकावर कठडे लावून व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना गाडीतून प्रवास करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची यावर सुध्दा मार्गदर्शन केले जात आहे.हळूहळू वाढणार गाड्यांची संख्यासध्या गोंदिया रेल्वे स्थानकावर हावडा-मुंबई आणि मुंबई हावडाच्या दिशेने जाणाºया १८ गाड्या धावण्यास शनिवारपासून सुरूवात झाली आहे. तर काही गाड्या येत्या दोन तीन दिवसात सुरू होणार आहेत. कोरोनाचा संसर्ग आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता हळूहळू रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ केली जाणार असल्याचे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मुकेशकुमार यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकावर सुरू झाली चहल पहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 5:00 AM
हावडा_मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक महत्त्वपूर्ण स्थानक असून या रेल्वे स्थानकावरुन दररोज दीडशे प्रवाशी गाड्या धावत होत्या. गोंदिया जिल्हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याला लागून असल्याने या रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजार प्रवाशी ये_जा करतात. तर रेल्वेच्या मालवाहतुकीच्या दृष्टीने सुध्दा हे रेल्वे स्थानक सर्वाधिक उत्पन्न देणारे आहे.
ठळक मुद्देपहिल्याच दिवशी ३०० तिकिटांची विक्री । विदर्भ एक्सप्रेस झाली सुरू