लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खर्रा, गुटखा आरोग्यास हानीकारक आहे. तो खाऊच नये, अशी अपेक्षा आहे. परंतु ज्याला गुटखा, खर्रा खायचा असेल तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र खर्रा, गुटखा खाऊन जिल्हा परिषद परिसरात भिंती रंगविणाºयांची गय केली जाणार नाही, अशी ताकीद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे यांनी दिली.जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात सोमवारी सकाळी ९ वाजता स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, दिवसभरातील आपल्या वेळेतील सर्वाधिक काळ आपण कार्यालयात घालवितो. अस्वच्छतेमुळे आजार बळावतात. शिवाय कामातील चैतन्यसुद्धा राहत नाही. त्यामुळे आपल्या घरासारखेच आपले कार्यालयसुद्धा स्वच्छ ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले.स्वच्छता मोहिमेच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी उपस्थित कर्मचाºयांना स्वच्छतेची शपथ दिली. तत्पूर्वी राष्टÑपिता महात्मा गांधी, राष्टÑसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, लाल बहादूर शास्त्री यांच्या छायाचित्राला मार्ल्यापण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर वाळवे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजेश वासनिक, जिल्हा आरोग्य अधिकारी श्याम निमगडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी ए.के. मडावी, राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलिंद रामटेके उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांनी स्वच्छतेबाबत आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात जिल्हा परिषदेतील २३८ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.प्रास्ताविक माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ अतुल गजभिये यांनी मांडले. संचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रमासाठी सामान्य प्रशासन विभागाचे जे.एल. खोटेले, माहिती, शिक्षण व संवाद तज्ज्ञ राजेश उखळकर, स्वच्छता तज्ज्ञ सूर्यकांत रहमतकर, शालेय स्वच्छता तज्ज्ञ भागचंद रहांगडाले, समाजशास्त्रज्ज्ञ तज्ज्ञ दिशा मेश्राम, पाणी गुणवत्ता तज्ज्ञ मुकेश त्रिपाठी, पाणी गुणवत्ता निरीक्षक व्ही.डी. मेश्राम, मनुष्यबळ विकास तज्ज्ञ तृप्ती साकुरे, मूल्यांकन व संनियत्रण तज्ज्ञ विशाल मेश्राम, शोभा फटिंग, महेश केंद्रे, नितीन रामटेके, टी.के. भांडारकर, एम.ए. केंद्रे, यू.एच. पळसकर, रमेश उदयपुरे यांनी सहकार्य केले.
भिंती रंगविणाºयांची गय केली जाणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 9:18 PM
खर्रा, गुटखा आरोग्यास हानीकारक आहे. तो खाऊच नये, अशी अपेक्षा आहे. परंतु ज्याला गुटखा, खर्रा खायचा असेल तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
ठळक मुद्देआर.एच. ठाकरे : मोहिमेत २३८ अधिकारी-कर्मचारी सहभागी