गोरेगाव : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला) अंतर्गत रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय पिंपरी (वर्धा) येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत तालुक्यात आले असून शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दैनंदिन शेती व शेती विषयक कार्यांचे निरीक्षण करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व जनजागृती करीत आहेत.
कृषीदूत नुपूर बोपचे, निधी कटरे, नेहा पटले, शिखर रहांगडाले, वर्षा बनसोड, योगेश चौधरी येथील शेतकरी रेखलाल टेंभरे यांच्या शेतात हा कार्यक्रम राबवीत आहेत. यात त्यांनी सर्वप्रथम गादीवाफा पद्धतीने बीजरोपण (सीडस नर्सरी) करून श्री व पट्टा पद्धतीने भात लागवड कशी करावी याबद्दल कटंगी गावातील शेतकऱ्यांना माहिती दिली. त्याचप्रमाणे याचे फायदे काय, रोग व किडींचे व्यवस्थापन, फळझाडांना बोर्डो मिश्रण लावणे याबद्दल मार्गदर्शन केले. यासाठी त्यांना गजानन पटले, फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अध्यक्ष लता टेंभरे, कृषी सहायक येरणे, पूर्ती खरेदी विक्री संस्थेचे व्यवस्थापक सुरेश चोपकर, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. मलापुरे, डाॅ. जयंतवार, कटंगीचे ग्रामसचिव अरविंद साखरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी भूरन टेंभरे, ओंकार नेवारे, शेखर राहांगडाले, भूरासाव चौरागडे, डीगू हरिणखेडे, अंकुश बघेले, कमला नेवारे, अनिता शेंडे यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.