लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जून महिना संपत असताना आतापर्यंत एक-दोनदाच जिल्हयात बरसलेल्या पावसाने गुरूवारी (दि.२७) रात्री जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. धो-धो बरसलेल्या या पावसाची जिल्ह्यात ३१९ मिमी नोंद घेण्यात आली असून त्याची ९.६७ एवढी सरासरी आहे. या पावसामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला असून अशाच पावसाची गरज आहे.७ जूनपासून मान्सून सुरू होतो असे बोलले जात असूनही अवघा जून महिना लोटून गेला तरिही फक्त एक-दोनदाच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे आतापर्यंत उकाडा कायम असून पंखे व कुलर शिवाय जीव कासावीस होत आहे. जून महिना लोटत असूनही पाऊस बरसत नसल्याने जिल्हावासीयांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून दमदार पाऊस बरसावा अशी देवाकडे प्रार्थना करीत आहेत. अशातच गुरूवारी (दि.२७) रात्री शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.धो-धो बरसलेल्या या पावसाने जिल्हावासीयांना चांगलेच खुश करून टाकले. जिल्ह्यात ३१९ मिमी पाऊस बरसला असून त्याची ९.६७ एवढी सरासरी नोंद करण्यात आली आहे. या पावसामुळे जिल्हावासीयांना उकाड्यापासून काही काळ दिलासाही मिळाला. शिवाय शेतीसाठीही हा पाऊस फायद्याचा ठरणार असून आतातरी दररोज असाच पाऊस पडावा अशी प्रार्थना जिल्हावासी करीत आहेत.१५५.२ मिमी पावसाची तूटजिल्ह्यात गुरूवारी बरसलेल्या पावसाने जिल्हावासीयांना खूश केले असले तरी जिल्ह्यातील पर्जन्यमान बघता २८ जूनपर्यंत सरासरी १८५ मिमी पाऊस बरसणे अपेक्षित आहे. असे असताना मात्र जिल्हयात आतापर्यंत फक्त २९.८० मिमी पाऊस बरसला आहे. म्हणजेच, अद्याप ११५.२ मिमी पावसाची तूट भरून निघायची आहे. यापुढे संततधार पाऊस बरसल्यावरच ही तूट भरून निघणार. त्यामुळे आता नियमित पावसाची गरज असून शेतकरीही आकाशाकडे नजरा लावून बसला आहे. दरम्यान, शुक्रवारीही पावसाने हजेरी लावली होती.देवरी व सडक-अर्जुनीत ठणठणाटगुरूवारी जिल्ह्यात दमदार हजेरी लावणारा पाऊस देवरी व सडक-अर्जुनी तालुक्यावर मात्र नाराज दिसून आला. ६ तालुक्यांत बरसलेला हा पाऊस देवरी व सडक- अर्जुनी तालुक्यात नसल्याची नोंद आहे. तर आतापर्यंत तिरोडा तालुक्यात सर्वाधिक २९९.५० मिमी पाऊस बरसला असून त्याची ५९.९० एवढी सरासरी नोंद करण्यात आली आहे.
धो-धो बरसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 9:20 PM
जून महिना संपत असताना आतापर्यंत एक-दोनदाच जिल्हयात बरसलेल्या पावसाने गुरूवारी (दि.२७) रात्री जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. धो-धो बरसलेल्या या पावसाची जिल्ह्यात ३१९ मिमी नोंद घेण्यात आली असून त्याची ९.६७ एवढी सरासरी आहे. या पावसामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला असून अशाच पावसाची गरज आहे.
ठळक मुद्देगुरूवारी रात्री दमदार हजेरी : सरासरी ९.६७ मीमी पावसाची नोंद