लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषद अग्नीशमन विभागाचे फायर स्टेशन गणेशनगर परिसरात असून या फायर स्टेशनमध्ये अग्नीशमन वाहनांमध्ये पाणी भरले जाते. मात्र फायर स्टेशनमध्ये मागील वर्षभरापासून सेफ्टीवॉल लावण्यात आलेले नाही. त्यामुळे दररोज एक हजार लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. दरवर्षी शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणीटंचाईची झळ सहन करावी लागते. मागीलवर्षी तर पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे आणून शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता.एकीकडे शहरात पाणीटंचाईची समस्या असताना दुसरीकडे मात्र हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यातच शहरातील नगर परिषद अग्नीशमन विभाग कधी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, सुरक्षा विषयक साधनांचा अभाव तर कधी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्रश्नावरुन चर्चेत असतो. सध्या हा विभाग आता दररोज होणाऱ्या पाण्याचा अपव्यय होत असल्यावरुन चर्चेत आहेत. नगर परिषद फायर स्टेशनमध्ये अग्नीशमन वाहनांत पाणी भरले जाते. याठिकाणी पाणी भरण्यासाठी मोठ्या पाईपचा वापर केला जातो.अग्नीशमन वाहनांमध्ये पाणी भरताना पाण्याचा अपव्यय होवू नये यासाठी त्या ठिकाणी सेफ्टीवॉल लावणे आवश्यक आहे. मात्र पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसत असताना देखील सेफ्टीवॉल लावण्यात आलेले नाही. त्यामुळे दररोज एक हजार लिटर पाण्याची नासाडी होत आहे. महिन्याकाठी ३० हजार लीटर पाण्याची अपव्यय होत आहे.हा प्रकार मागील वर्षभरापासून सुरूच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असताना व दुसरीकडे शहरवासी पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देत असताना अद्यापही नगर परिषद व अग्नीशमन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सेफ्टीवॉल अभावी दररोज हजार लिटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 5:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नगर परिषद अग्नीशमन विभागाचे फायर स्टेशन गणेशनगर परिसरात असून या फायर स्टेशनमध्ये अग्नीशमन वाहनांमध्ये ...
ठळक मुद्देनगर परिषदचे फायर स्टेशन : वर्षभरापासून समस्या कायम