राजेश मुनीश्वरलोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने यंदा पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होणार हे स्पष्ट होते. मात्र जिल्हा प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्याने तालुक्यातील जनतेला तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पहाटेपासूनच महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचे चित्र तालुक्यात ठिकठिकाणी पाहयला मिळत आहे.तालुक्यात मागील वर्षी केवळ ५७ टक्के पाऊस झाला. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच तालुक्याची भूजल पातळी खालावली होती. त्यानंतर भूजल पातळीत सातत्याने होत घट होत असल्याने तालुक्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे.भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा भूजल पातळीचा अहवाल जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला होता. यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाईचीे गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र प्रशासनाने ही बाब गांर्भियाने न घेतल्याने तालुकावासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील वडेगाव, परसोडी, खजरी, म्हसवानी, बोथली, खोडशिवनी, डोंगरगाव, डव्वा, पांढरी, कोसमतोंडी, मुरपार, लेंडेझरी, पळसगाव, भुसारीटोला झुरकुटोला, पाटेकुर्रा, डोमेटोला, मनेरी, कनेरीे, चिखली, राका, कोसबी, कोकणा-जमी, खोबा, जांभळी-दोडके, सिंदीपार, सौंदड, बाम्हणी, खडकी, सावंगी, खोदायती, सडक-अर्जुनी, पांढरवाणी, केसलवाडा, पुतळी, कोयलारी, शेंडा, मसरामटोला, सहाकेपार, मुशानझुरवा, श्रीरामनगर बोपाबोडी, हेटी, गिरोला, कोदामेडी, तिडका, हलिमारेटोला, बकी, मेंडकी, कोसमघाट, सालईटोला या गावात पाणी टंचाई समस्या अधिक बिकट आहे. त्यामुळे या गावातील महिलांना पहाटेपासूनच पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. तालुक्याची लोकसंख्या १ लाख १५ हजार ५९४ असून लोकसंख्येच्या प्रमाणात पाणी पुरवठ्याचीे साधने अपुरी असल्याने दरवर्षी तालुक्यातील नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते.ही बाब प्रशासनाला सुध्दा चांगली माहिती आहे. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिल्याने या समस्येत अजून वाढ झाल्याचे चित्र आहे. उमरझरी मध्यम प्रकल्प व दोडके-जांभळी या प्रकल्पातून २० किमी अंतरावर पाणी आणण्याची योजना तयार करण्यात आली. मात्र प्रकल्पातच अल्प पाणीसाठा असल्यामुळे या प्रकल्पातून पाणी पुरवठा कसा होईल व शहरवासीयांची तहान कशी भागेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. उमरझरी मध्यम प्रकल्पाचे पाणी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून आणले जात आहे. मात्र ठिकठिकाणी पाईप लाईन लिकेज असल्यामुळे शहरापर्यंत पाणी पोहचेपर्यंत हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंदतालुक्यातील १६ गावे व २० वाड्यांना पाणी पुरवठा करणारी प्रादेशिक पाणी योजना बंद पडली आहे. तर बाम्हणी-खडकी येथील पाणी पुरवठा योजनेची तिच स्थिती आहे. सालईटोला येथील पाणी पुरवठा योजना पुतळीच्या माध्यमातून सडक-अर्जुनी शहराला पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. दोन प्रादेशिक पाणी पुरवठा बंद असल्याने पाणी टंचाईच्या समस्येत अधिक भर पडली आहे.गढूळ पाण्याचा पुरवठाउन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाणी टाकीची स्वच्छता व गाळाचा उपसा करण्याची गरज होती. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून सडक-अर्जुनी शहरवासीयांना गढूळ व माती मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत आहे. गढूळ पाणी पुरवठ्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या भागात सर्वाधिक पाणी टंचाईसडक-अर्जुनी शहरातील शिक्षक कॉलनी, कस्तुरीदेवी नगर, प्रगती कॉलनी, लहरी नगरी, पंचायत समिती कॉलनी, कुंभार मोहल्ला, हनुमान मंदिर, पेट्रोल पंपसमोरील कॉलनीत मागील काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाई आहे. या भागात १५ ते २० बोअरवेल तसेच विहिरी आहेत. मात्र त्यांना पाच ते दहा मिनिटेच पाणी येत असल्याने या भागातील नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत आहे. पाणी टंचाईची समस्या ओळखून उमरझरी मध्यम प्रकल्पाचे पाणी सडक-अर्जुनी जवळून वाहणाºया नदीत सोडण्यात यावे. पाणी टंचाईवर मात करणे शक्य होईल. तसेच जनावरांना सुध्दा पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल.८० टक्के विहिरी पडल्या कोरड्यातालुक्यात विंधन विहीरी १०२० आहेत. लघू नळ पाणी पुरवठा योजना ५३ आहेत. ग्रामीण पाणी पुरवठा योजना ३४ आहेत. सार्वजनिक विहिरी ४३२ तर खासगी विहिरी १६२० आहेत. यापैकी सार्वजनिक व खाजगी विहिरीच्या ८० टक्के विहीरी कोरड्या पडल्या असल्याची माहिती पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी गजभिये यांनी सांगितले.
तालुक्यात पाणी पेटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 10:04 PM
मागील वर्षी जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने यंदा पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होणार हे स्पष्ट होते. मात्र जिल्हा प्रशासनाने वेळीच उपाय योजना न केल्याने तालुक्यातील जनतेला तीव्र पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
ठळक मुद्देगावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती : प्रशासनाचे दुर्लक्ष भोवले