लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बंदी असलेल्या पाणी पाऊचचा साठा येथील नगर परिषदेच्या पथकाने मंगळवारी (दि.१७) धाड घालून जप्त केला. रामनगर परिसरातील पाणी पाऊच वितरकाच्या घरातून हा माल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये पाणी पाऊचच्या १०४ बॅग्स जप्त करून संबंधिताला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.राज्यात प्लास्टीक बंदी करण्यात आली आहे.त्यांतर्गत प्लास्टिकपासून तयार विविध वस्तूंचा समावेश असून पाणी पाऊचही त्यात येतात. मात्र तरिही त्यांचा पुरवठा व वापर सर्रास सुरूच आहे. येत्या १ मे पर्यंत राज्य सिंगल यूज प्लास्टीक मुक्त करण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. असे असताना मात्र प्लास्टिकचा वापर सुरूच असून त्यातच पाणी पाऊचचाही वापर दिसून येत आहे. हा प्रकार बघता नगर परिषदेच्या पथकाने रामनगर परिसरातील पाणी पाऊच वितरक श्याम ट्रेडर्स संचालक किशोर चौरसीया यांच्या घरावर मंगळवारी (दि.१७) धाड घातली. या धाडीत पथकाने घरातून पाणी पाऊचच्या १०४ बॅग्स जप्त केल्या. तसेच त्यांना पाच हजार रूपयांचा दंड करून वसुली केली.ही कारवाई, आरोग्य निरीक्षक गणेश हतकय्या, मुकेश शेंद्रे, मनिष बैरिसाल, प्रफुल पानतवने, सुमित शेंद्रे, प्रतीक मानकर, परेश शेंडे, जसवंत महावत यांनी केली.विशेष म्हणजे, पथकाने ही कारवाई केल्यानंतर काही जणांचे फोनही पथकातील सदस्यांना आल्याची माहिती आहे. शासनाकडून एकीकडे प्लास्टिक बंदीसाठी निर्देश दिले जात आहेत. तर दुसरीकडे मात्र स्थानिकांकडूनच त्यामध्ये आडकाठी आणली जात असल्याचेही बोलले जात आहे.शहरात प्लास्टिकचा सर्रास वापरराज्यात प्लास्टिक बंदी असली तरीही आजघडीला प्लास्टिक वस्तूंचा सर्रास वापर सुरूच असल्याचेही दिसून येत आहे. सर्वात जास्त वापर बाजारात होत असून आजही प्लास्टिक पिशव्यांतून सामान दिले जात आहे.मात्र नगर परिषदेने अद्याप कारवाई केली नसल्याचे दिसते.बाजारातील प्लास्टिक व्यवसायीकांकडे धडक दिल्यास नक्कीच प्लास्टिक वापर नियंत्रणात येणार. शिवाय, यामध्ये कुणीही राजकारण न केल्यास येत्या १ मे पर्यंत शहर सिंगल यूज प्लास्टिक मुक्त होऊ शकणार.
पाणी पाऊचचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 6:00 AM
राज्यात प्लास्टीक बंदी करण्यात आली आहे.त्यांतर्गत प्लास्टिकपासून तयार विविध वस्तूंचा समावेश असून पाणी पाऊचही त्यात येतात. मात्र तरिही त्यांचा पुरवठा व वापर सर्रास सुरूच आहे. येत्या १ मे पर्यंत राज्य सिंगल यूज प्लास्टीक मुक्त करण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. असे असताना मात्र प्लास्टिकचा वापर सुरूच असून त्यातच पाणी पाऊचचाही वापर दिसून येत आहे.
ठळक मुद्देनगर परिषदेची कारवाई : १०४ बॅग्स जप्त व पाच हजार रूपयांचा दंड