शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

गोंदियावासीयांवर यंदाही पाणीटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2018 12:11 AM

उन्हाळ्याला सुरूवात होण्यास अद्याप तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्याची झळ आतापासून बसायला सुरूवात झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी पातळीत घट झाल्याने अधेमधे पाणी कपात करण्यास सुरूवात केली.

ठळक मुद्देआतापासून पाणीपुरवठ्यात कपात : पातळीत घट झाल्याने समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याला सुरूवात होण्यास अद्याप तीन ते चार महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्याची झळ आतापासून बसायला सुरूवात झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने पाणी पातळीत घट झाल्याने अधेमधे पाणी कपात करण्यास सुरूवात केली. त्यामुळे उन्हाळ्यात शहरात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.गोंदियापासून १८ कि.मी.अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाचे शहरात ४० हजारावर ग्राहक आहेत.त्यांना प्रती व्यक्ती १३५ लीटर याप्रमाणे दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. मात्र मागील महिनाभरापासून शहरवासीयांना अनियमित पाणी पुरवठा केला जात आहे.पावसाळा संपत असतानाच अनियमित पाणी पुरवठा केला जात असल्याने शहरवासीयांमध्ये खळबळ उडाली आहे. यासंदर्भात प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यंदा परतीचा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. त्यामुळे वैनगंगा नदीचे पात्र आत्तापासूनच कोरडे पडले आहे.परिणामी नदीवर पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विहिरींची पाण्याची पातळी सुध्दा कमी झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांना नियमित पाणी पुरवठा करण्यात अडचण निर्माण झाली आहे.यंदा प्रथमच आॅक्टोबर महिन्यातच पाणी पातळी घट झाल्याने पुढील तीन चार महिने कठीण असल्याचे सांगितले. मागीलवर्षी सुद्धा शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. तीच परिस्थिती यंदाही निर्माण होण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागातही समस्याजिल्ह्यातील सडक अर्जुनी, तिरोडा तालुक्यातील आठ ते दहा गावांमध्ये आत्तापासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावातील महिलांना पाण्यासाठी दूरवर पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.पुजारीटोला धरणावर भिस्तमागीलवर्षी शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने गोंदियापासून ८० किमी अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून नहराव्दारे पाणी आणून पाणी आणून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्यात आला होता. यंदा सुद्धा पुन्हा तोच प्रयोग करावा लागणार असून त्यादृष्टीने महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने पाऊले उचलल्याची माहिती आहे.

टॅग्स :Damधरण