शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
12
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
13
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
14
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
15
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
16
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
17
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

पाणीटंचाई प्रश्नी जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 9:21 PM

उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात यंदा प्रशासन पूर्णपणे फेल ठरले. त्यामुळे जिल्ह्यावासीयांना पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाईचा विषय लोकमतने लावून धरल्यानंतर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे या अ‍ॅक्शन मोडवर येत गुरूवारी (दि.९) जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना भेट देवून पाहणी केली.

ठळक मुद्देपाणीटंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी : उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्याला सुरूवात होण्यापूर्वी पाणीटंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्यात यंदा प्रशासन पूर्णपणे फेल ठरले. त्यामुळे जिल्ह्यावासीयांना पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाईचा विषय लोकमतने लावून धरल्यानंतर जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे या अ‍ॅक्शन मोडवर येत गुरूवारी (दि.९) जिल्ह्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांना भेट देवून पाहणी केली. तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना उपाय योजना करण्याचे निर्देश दिले.भूजल सर्वेक्षण विभागाने पाणी टंचाईचा संभाव्य आराखडा जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे सादर केल्यानंतर तो आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करुन उपाय योजना करण्याची गरज होती. मात्र जि.प.ग्रामीण पुरवठा विभागाने यंदा लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या नावावर दोन महिने वेळमारून नेली. त्यामुळे जिल्ह्यातील ३९८ गावांतील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागले. तर सहा गावातील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली. अनेक गावातील महिलांना पहाटेपासूनच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. दरम्यान या सर्व प्रकारानंतर प्रशासनाचा अनागोंदी कारभार पुढे आला. यावर ओरड वाढल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी गुरूवारी (दि.९) देवरी तालुक्यातील शिलापूर, बोरगाव, आमगाव तालुक्यातील अंजोरा जिल्हा परिषद क्षेत्रात येत असलेल्या वागडोंगरी, बाघाटोला व रामाटोला या गावांना भेट देऊन बोअरवेल आणि विहिरीची पाहणी करुन उपाय योजना करण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. नवीन बोअरवेल व जुन्या बोअरवेलासाठी पाईप पुरवठा करण्यास सांगितले.२०१९ च्या पाणी टंचाई आराखड्यातील पहिल्या टप्यात ज्या २५ गाव-वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरी, खामकुरा, झाशीनगर, पिपरखारी इंदिरानगर, आमगाव, मांगोटोला, महाका उचेपूर, जेठभावडा, बोरगाव शिलापूर, टेकरी, बुराडीटोला, डोंगरगाव, जवरी, शिवनटोला, शिवनी, खुर्सीपारटोला, खुर्शीपार, ठाणा, आसोली, जांभुरटोला, तिगाव, बघेडा, वडद, सोनेखारी, पाऊडदौना या गावांचा समावेश आहे.यापैकी काहीं गावांना जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करुन वस्तू स्थिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हाश्मी, वरिष्ठ भुजलवैज्ञानिक नंदकिशोर बोरकर, उपविभागीय अधिकारी राठोड यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य जियालाल पंधरे, रामाटोल्याच्या सरपंच संगिता ब्राम्हणकर, पाऊळदौन्याचे सरपंच खेमराज उईके, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी