दुसरा टप्पा टंचाईमुक्त : २३ गावे व ९ वाड्यात नव्याने विंधन विहिरींची सोयगोंदिया : उन्हाळ्याची चाहूल लागताच राज्यभर पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य जाणवते. परंतु तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई कोणत्याही भागात जाणवत नाही. उन्हाळ्याची चाहुल लागली असताना पाणी टंचाईच्या दुसऱ्या टप्यात जिल्ह्यात एकाही गावात पाणी टंचाई भासणार नाही अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी शासनाने १४२० जलस्त्रोत उपलब्ध करून दिले आहेत.गोंदिया जिल्हा परिषदेने जिल्हात सुरूवातीपासून आतापर्यंत ८ हजार ९७९ विंधन विहीरी तयार केल्या आहेत. १२५ विद्युत पंप, ४ हजार ४६६ साध्या विहीरी, २८९ सोलर पंप, १५ प्रादेशिक योजना तर ३२६ स्वतंत्र योजना आहेत. गोंदिया जिल्ह्यात आताच्या स्थिीतीत ५५० ग्राम पंचायत, १ हजार ६४२ वाड्या आहेत. १५ प्रादेशिक योजनांमध्ये चार योजना जि.प. मार्फत चालविल्या जातात. एक योजना जीवन प्राधीकरणाच्या माध्यामातून चालविली जाते. सात योजना पाणी मंडळामार्फत चालविल्या जात असून ३ योजना नादुरूस्त आहेत. शासनाकडून आॅक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्यात गोंदिया जिल्ह्यात पाणी टंचाई नव्हती. दुसरा टप्पा असलेल्या जानेवारी ते मार्च या या काळातही पाणी टंचाई जिल्ह्यात कुठेही जाणवत नाही. तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाण राहू शकते. (तालुका प्रतिनिधी)
पाण्यासाठी १४२० स्रोत
By admin | Published: February 25, 2016 1:33 AM