शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

पाण्याची भिस्त पुजारीटोलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 12:57 AM

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा नदीचे पात्र देखील कोरडे पडले आहे. त्यामुळे डांर्गोली येथे या वैनगंगा नदीजवळ उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून....

ठळक मुद्देकमी पावसामुळे पाणी साठ्यात घट : महाराष्टÑ जीवन प्राधिकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा नदीचे पात्र देखील कोरडे पडले आहे. त्यामुळे डांर्गोली येथे या वैनगंगा नदीजवळ उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून गोंदिया शहराला केल्या जाणाºया पाणी पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळेच महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने आता पुजारीटोला प्रकल्पातून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.गोंदिया शहराला महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. प्राधिकरणाचे शहरात १३ हजारांवर ग्राहक आहेत.प्रती व्यक्ती १३५ लिटर या प्रमाणे दिवसांतून दोनदा पाणी पुरवठा केला जातो.शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी गोंदियापासून १८ कि.मी.अंतरावर डांर्गोलीजवळील वैनगंगा नदीवर पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे.मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत घट झाली असून वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे शहराला नियमित केल्या जाणाºया पाणी पुरवठ्यात कपात करण्याची वेळ महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागावर आली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात शहरवासीयांवरील पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होवू शकते.मात्र उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्टÑ जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता आर.पी.चंद्रीकापुरे, उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके, वाघ इटियाडोह विभागाचे सहायक अभियंता शुभम, एम.जी.भेंडारकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत जानेवारी ते जून महिन्यादरम्यान गोंदिया शहराला पुजारीटोला प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.८० कि.मी.वरुन पाणी पोहचविणे कठीणगोंदियापासून ८० कि.मी.अंतरावर असलेल्या वाघ नदीवर पुजारीटोला प्रकल्प उभारण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पात केवळ १६ दलघमी पाणीसाठा आहे. या प्रकल्पाचे गेट उघडून वाघ नदीत पाणी सोडल्यानंतर ते पाणी बिरसोला गावाजवळ पोहचेल. या प्रकल्पापासून गोंदियापर्यंतचे अंतर ८० कि.मी.चे असल्याने पाणी आणण्यासाठी मोठा कस लागणार आहे. पाणी पोहचविण्याचे नियोजन केल्यानंतरही ते गोंदियापर्यंत पोहचणार की नाही.याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.३० वर्षानंतर प्रथमच जलसंकटमागील २५ ते ३० वर्षांच्या कालावधीत प्रथमच शहरवासीयांना केल्या जाणाºया पाणी पुरवठ्यात कपात करण्याची वेळ महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागावर आली आहे. आॅक्टोबर महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होवू नये, यासाठी पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याचा उपयोग करण्याची देखील पहिलीच वेळ असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी सांगितले.दुसरा पर्यायवाघ नदीऐवजी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी मुख्य नहराव्दारे पाणी सोडून ते रजेगावजवळील कन्हारटोला नाल्याच्या माध्यमातून पोहचविणे शक्य आहे. हे अंतर देखील ७० कि.मी.चे आहे.कन्हारटोला ते डांर्गोली हे अंतर दीड कि.मी.चे आहे. पुजारीटोलाचे पाणी नहराव्दारे आणण्याचे असेल तर नहराचे इतर ठिकाणाचे सर्व गेट बंद करावे लागतील. त्याची अधिसूचना देखील काढावी लागेल. तेव्हाच पाणी डांर्गोलीपर्यंत पोहचेल. सध्या जिल्हा प्रशासन आणि पाणी पुरवठा विभागाने या दोन्ही पर्यांयावर अभ्यास करणे सुरू केले आहे. जो पर्याय योग्य ठरेल त्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा केला जाणार आहे.पाणी बचतीचे आवाहनकमी पावसामुळे पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले जात आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करुन अपव्यय टाळण्याची सूचना सुद्धा केली जात आहे.