प्रवृत्त करणारे मोकाटच : आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यावर सुई ?आमगाव : बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत रूक्मिणी धानुदास मुनेश्वर या कंत्राटी आरोग्य सेविकेने हिवताप क्लोरिक्विनच्या गोळ्या खाऊन १२ आॅगस्टला आत्महत्या केली. मात्र या आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठी आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याने प्रवृत्त केल्याची असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची सविस्तर व सखोल चौकशी करुन आरोपींना त्वरित अटक झाली पाहिजे अशी अनेकांची मागणी आहे.या घटनेमागे एका कंत्राटी चालकाचाही संबंध असल्याची चर्चा आहे. ज्या दिवशी या आरोग्य सेविकेने हिवतापाच्या गोळ्या सेवन केल्या त्याच दिवशी कंत्राटी चालक व मृतक आरोग्य सेविकेचे देवरी रोडवर कडाक्याचे भांडण झाल्याची चर्चा आहे. रागाच्या भरात सदर महिलेने गोळ्या घेवून आपले प्राण संपविण्याचा प्रयत्न केला. तिला उलट्या सुरू झाल्यानंतर एका कर्मचाऱ्याने तिची थट्टाही केल्याचे सांगितले जाते. त्याच कालावधीत जर तिच्यावर योग्य उपचार झाला असता तर ती कदाचित वाचली असती. आता हे प्रकरण आपल्यावर येईल म्हणून सर्वच कर्मचारी सारवासारव करीत आहेत. एकंदरित कंत्राटी आरोग्य सेविकेचा मृत्यू त्या दोघातील भांडणामुळे झाला आहे व त्यात एका मदतनिसाचा हात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी अनेकांनी केली आहे. नवीन आलेले पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर याप्रकरणी काय करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)
दर्यापुरात गांधी वेशभूषेचा विक्रम
By admin | Published: August 21, 2016 12:02 AM