नाना पटोले : सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिरलोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थ्यांची भूमिका एकलव्यासारखी असते. संदभावनेचा आदर, मोठ्यांचा आदर, राष्ट्रप्रती प्रेम आणि सेवाभावी कार्य करण्याची प्रेरणा अशा शिबिरातून मिळत असते. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्ळा व्यक्तिमत्व विकास घडविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून होत असते. आज आपण बघत आहोत चांगले विचार कोणी कधिच शेअर करताना दिसत नाही. वाईट विचार लगेच शेअर करताना दिसतात. जीवनाच्या समृद्धिकडे वाटचाल करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य स्विकारणे आवश्यक असल्याचे प्रतिपाादन माजी खासदार नाना पटोले यांनी येथे केले.डॉ. राधाकृष्ण हायस्कुल कनेरी/केशोरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठ नागपूर अंतर्गत शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव यांच्या विद्यमाने आयोजित सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष लुणकरण चितलांगे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संचालक राष्ट्रीय सेवा योजना रा.तु.म. विद्यापिठ नागपूर डॉ. केशव वाळके, संस्था सदस्य तथा समन्वयक डॉ. वासुदेव भांडारकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यपालन अधिकारी आर. व्ही. राठोड, संस्था सचिव मुकेश जायस्वाल, संस्था उपाध्यक्ष बद्रीप्रसाद जायस्वाल, जि.प.सदस्या तेजूकला गहाणे, पं.स. सदस्या अर्चना राऊत, सरपंच अश्विनी भालाधरे, मुख्याध्यापक शालीक कोरे, भागवत पाटील नाकाडे, नामदेव पाटील नाकाडे, नारायण घाटबांधे, ग्रा.पं.सदस्य मनोहर ठाकरे, नारायण घाटबांधे, ग्रा.पं. सदस्य मनोहर ठाकरे आणि विविध महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. पाहुण्यांचे हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करुन दीप प्रज्वलनानंतर या भारतात बंधू भाव नित्य असुदे, देवरची असा दे, या संत तुकडोजी महाराज यांच्या राष्ट्र उद्बोधन गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पटोले म्हणाले, अशा शिबिरातून निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये देशहित, देशाप्रती दायीत्व आणि संस्कारीत विद्यार्थी घडविली जातात. मी सुद्धा त्याच राष्ट्रीय सेवा मधून मोठा झालो आहे. देश सेवा आणि आरोग्य संवर्धन करण्याचे सामर्थ्य आजच्या युवा शक्तीमध्ये आहे. आपल्या जीवनाच्या समृद्धिकडे वाटचाल करावयाची असेल तर आपले विचार चांगले, सुंदर आणि विचारात गंध असायला पाहिजे. त्याचा सुगंध जिकडे तिकडे पसरणे गरजेचे आहे.देशसेवेसाठी तळपून निघाल्याशिवाय गरीब श्रीमंत असा भेद राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या विचाराचे ऐवढे महात्मे आहे. की, जो विद्यार्थी या विचारांचा अभ्यास करील त्याचा जीवनमान उंचावल्याशिवाय राहणार नाही. ग्रामगीतेतून तुकडोजी महाराजांनी जीवनाचे सार सांगितले आहे. परंतु त्याचा चुकीचा अर्थ लावून विद्रोह करण्याचा काही समाज कंटक करीत आहेत. त्यांना धडा शिकविण्याचे कार्य ही युवा शक्ती करु शकते. युवा शक्तीच्या माध्यमातूनच देश सशक्त व सुरक्षित राहू शकते. शिबिरात महाराष्ट्रातील आठ विद्यापीठानी ४० महाविद्यालयामधून २३० विद्यार्थी सहभागी झाले आहे.प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ. संजीव पाटणकर यांनी या शिबिराच्या माध्यमातून दरवर्षी आमची महाविद्यालय असे शिबिर आयोजित करुन आरोग्य संवर्धनाकरिता, स्वच्छतेकरिता झटत आहे. राष्ट्रीय स्तरावरील सेवा योजना शिबिराची संधी देण्याची विद्यापीठाकडे विनंती केली.
शिबिरातूनच समृद्धीच्या वाटचालीचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 9:58 PM