लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदियाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प घेऊन आम्ही सत्तेत आलो. काही लोकांनी आम्हाला न्यायालयीन प्रकरणात गोवल्याने त्यात ९ महिने गेले. मात्र आता आम्ही पूर्ण ताकदीने शहराच्या विकासाकरिता मैदानात उतरलो आहोत. आम्ही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी केले.शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील बोडीच्या (तलाव) सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजन प्रसंगी गुरूवारी (दि.२८) ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगर परिषद बांधकाम सभापती घनश्याम पानतवने, पाणी पुरवठा सभापती दिलीप गोपलानी, शिक्षण सभापती भावना कदम, नियोजन सभापती मैथुला बिसेन, महिला व बालकल्याण सभापती अनिता मेश्राम, नगरसेवक अफसाना मुजीब पठाण, माजी नगरसेवक सुनीता हेमने, राहुल यादव, पालिकेचे प्रशासकीय अधिकारी सी.ए. राणे, कंत्राटदार श्याम चंदनकर, बांधकाम विभागाचे अभियंता बारई उपस्थित होते.पुढे बोलताना इंगळे यांनी, शहराच्या विकासात फक्त सत्ताधारी काहीही करू शकत नाही. त्याकरिता विरोधक आणि नागरिकांचे सहकार्य सुद्धा आवश्यक आहे. आमच्या मागच्या रेझिमने सुद्धा अनेक चांगली कामे केली.शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचे फक्त स्वप्न न राहता ते प्रत्यक्षात उतरविण्यात येणार आहेत. शहरातील बगीचे असोत किंवा रस्ते, नाल्या सर्वांचे बांधकाम येत्या काळात होणार असल्याचेही सांगीतले. पटले यांनी, भारतीय जनता पक्षाने नगर पालिकेच्या निवडणुकीत रस्ते, सौंदर्यीकरण, नाली, शुद्ध पाणी, भूमिगत गटार योजना आदींची कामे करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची सुरूवात सिव्हिल लाईन बोडीच्या कामाने झाली असल्याचे सांगीतले.प्रास्ताविक दीपक कदम यांनी मांडले. संचालन शहर महामंत्री चंद्रभान तरोने यांनी केले. आभार सभापती भावना कदम यांनी मानले. कार्यक्र मासाठी अजय इंगळे, सतीश चौहान, बबन येटरे, नवरतन अग्रवाल, मंजले यादव, संजय इंगळे, पुनजी लिल्हारे, हासानंद गोपलानी, मनोहर ठाकूर, सुनील तिवारी, पप्पू अरोरा, शैलेंद्र मिश्रा, पंडित नरेंद्र शुक्ल, रमण मिश्रा, मनोज मेंढे, मोती कुरील, किशोर व्यास, प्रल्हाद विश्वकर्मा, पिंकी तिवारी, योगेश गिरीया, कार्तिक यादव, भरत कानोजिया, सुमित तिवारी, राम पुरोहित आदींनी सहकार्य केले.हनुमान मंदिर प्रवेशद्वारचेही भूमिपूजनसिव्हील लाईन्स बोडीच्या सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे निमित्त साधून सिव्हिल लाईन हनुमान मंदिरासमोर भव्य प्रवेशद्वाराचे सुद्धा भूमिपूजन करण्यात आले. शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान मंदिर प्रख्यात असून लोकांचे श्रद्धास्थान आहे. यातूनच येथे प्रवेशद्वार तयार करण्याची मागणीही होती.
विकासासाठी आम्ही कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:12 AM
गोंदियाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प घेऊन आम्ही सत्तेत आलो. काही लोकांनी आम्हाला न्यायालयीन प्रकरणात गोवल्याने त्यात ९ महिने गेले. मात्र आता आम्ही पूर्ण ताकदीने शहराच्या विकासाकरिता मैदानात उतरलो आहोत. आम्ही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी केले.
ठळक मुद्देअशोक इंगळे : सिव्हिल लाईन बोडीचे भूमिपूजन थाटात