ऑनलाईन लोकमतगोंदिया : तालुक्यातील वीजेच्या कमी दाबाची समस्या असो की बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन. रजेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात असो की, रावणवाडी पोलीस ठाण्याची स्थापना. क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून आमच्या प्रयत्नातूनच क्षेत्रात विकासाची एक श्रृंखला सुरू आहे. जनतेने आमच्यावर ही जबाबदारी टाकली असून शासकीय योजनांचा लाभ सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम पुजारीटोला (कासा) येथील १० लाख रूपयांच्या रस्ता डांबरीकरण, ग्राम बिरसोला येथील १० लाख रूपयांच्या रस्ता खडीकरण, १० लाख रूपयांच्या बिरसोला-सिंगलटोली रस्ता डांबरीकरण व १० लाख रूपयांच्या ग्राम बिरसोला येथील रस्ता सिमेंटीकरण कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, देवेंद्र मानकर, अनिल मते, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, मोहपत खरे, गिरजा जमरे, लोकचंद दंदरे, गिता माने, सुरपत खैरवार, राजेश जमरे, दिनेश मरठे, योगेश चौधरी, कौशल पाचे, चंद्रकली चौधरी, सुनिता माने, शिवप्रसाद पाचे, नत्थु माने, धनीराम चौधरी, जितेंद्र कोहराम, अशोक तिवारी, श्रीराम माने, बबीता देवाधारी, झनकसिंग तुरकर, कत्तेलाल मातरे, निर्वता पाचे, दिलीप तुरकर, कपूरचंद पाचे, रामभगत पाचे, कांती पाचे, डॉ. देवा जमरे यांच्यासह अन्य कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ता व गावकरी उपस्थित होते.
शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 1:09 AM
तालुक्यातील वीजेच्या कमी दाबाची समस्या असो की बिरसी विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन. रजेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात असो की, .....
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम पुजारीटोली व बिरसोला येथे विकासकामांचे भूमिपूजन