गोंदिया : हवामान खात्याने यंदा शंभर टक्के आणि भरपूर पावसाचा अंदाज वर्तविला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र जून महिना संपत असतानासुध्दा अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. सरासरीच्या केवळ १० टक्केच पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्या खोळंबण्याच्या मार्गावर असून केलेल्या पेरण्यासुध्दा आता संकटात आल्या आहे.
मृगाच्या दमदार सरी बसरल्यानंतर शेतकरी पेरणीच्या कामाला सुरुवात करतात. जिल्ह्यात मृगाचा पाऊस पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. परिणामी नदीनाले अजूनही कोरडे पडल्याचे चित्र आहे. गाढवाच्या नक्षत्रात पावसाने धोका दिला त्यामुळे कोल्ह्याच्या नक्षत्रात नावाप्रमाणेच पाऊस बरसत नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. हवामान विभाग दरवर्षी पावसाचा अंदाज वर्तविते, पण त्यांच्या अंदाजानुसार पाऊस बरसत नसल्याचा शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव आहे. अनेकदा हवामान विभागाचा अंदाज पोकळ ठरला आहे. परिणामी याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यंदासुध्दा हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला, पण तो आता सुरुवातीला हा अंदाज चुकत असल्याने पुढे काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावित आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने शेतकरी अधिक अडचणीत येत आहे.
.............
तालुकानिहाय झालेला पाऊस व पेरणी
तालुका झालेला पाऊस पेरणी
गोंदिया १९३७
गोरेगाव १३१७
तिरोडा ९०
सडक अर्जुनी ११४७
अर्जुनी मोरगाव ८०४
आमगाव ८००
सालेकसा ६००
देवरी ३००
..............................................................................
पीकनिहाय क्षेत्र
धान १८६४३१ हेक्टर
तृण धान्य ४३७२
तूर १०७६
तीळ ३९२
..........................................
पावसाची स्थिती मिमीमध्ये
अपेक्षित पाऊस : १९२.८
आतापर्यंत झालेला पाऊस : १३२.८
................
सर्वात कमी पाऊस :
सर्वात जास्त पाऊस :
.......................
कोठे किती पेरणी हेक्टरमध्ये
अपेक्षित पेरणी क्षेत्र : १८६४३१
आतापर्यंत झालेली पेरणी : ६९९३
........................
तर खत, बियाणे मिळणार कसे
यंदा बियाण्यांचे दर आधीच महागले आहेत. त्यातच आता दुबार पेरणी करावी लागली तर त्यासाठी लागणारे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न आहे. तर नवीन बियाणे सुध्दा त्वरित उपलब्ध होणे कठीण आहे.
- रामदास बिसेन, शेतकरी
.............
मागील वर्षी बियाणे राखून ठेवले होते. तेच यंदा उपयोगात आणले त्यामुळे बियाणे घेण्याचा खर्च वाचला. मात्र आता पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागल्यास मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
- राधेश्याम दमाहे, शेतकरी
................
दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे आधीच मोडले आहे. त्यातच आता पावसाअभावी पेरण्या खोळंबल्यास मोठी समस्या निर्माण होईल.
- दादाजी बोरकर, शेतकरी