गोंदिया : येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन दिनाचे निमित्त साधून ‘डिजिटल युगात पुस्तके वाचण्याची आवश्यकता’ या विषयावर एक दिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ. शारदा महाजन यांच्या मार्गदर्शनात आयोजित या कार्यक्रमात त्यांनी व्यक्तीच्या विकासासाठी वाचन किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. आयक्यूआयएससीचे कोऑर्डिनेटर डॉ.एस.यू खान यांनी वाचन संस्कृती आपल्या समाजात कशी रुजेल हे सांगितले. प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील महिला महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाचे डॉ. चंद्रशेखर गीते यांनी वाचाल तर वाचाल ही म्हण आजघडीला किती समर्पक आहे, सांगितले. या वेबिनारमध्ये महाराष्ट्रातून विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन ग्रंथपाल डॉ. सुनील जाधव यांनी केले. आभार संजय राठोड यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. बबन मेश्राम, प्रा. एच. पी. पारधी, डॉ. योगेश बैस, डॉ. मुनेश ठाकरे, सुयोग इंगळे, उमेश उदापुरे, प्रा. नरेश भुरे, शैलेश वैष्णव, पवन शेंद्रे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.