केशोरी या गावाला लहान मोठी २५-३० खेडी लागून असल्याने येथील आठवडे बाजारात नागरिकांची मोठी गर्दी होत असते. बाजार भरविणाऱ्या ग्रामपंचायतीने या बाजाराचे कंत्राट एका खासगी ठेकेदाराला दिले असल्याने तो फक्त दुकानदारांकडून कराची वसुली करुन निघून जातो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडून उपाययोजना होताना दिसत नाही. त्यामुळे बाजारातील ग्राहक व विक्रेत्यांच्या तोंडावर मास्कचा वापर हाेत असल्याचे दिसून येत नाही. त्यांच्याकडून शासनाने दिलेल्या त्रिसूत्रीचा वापर होताना दिसत नाही. या प्रकारामुळे आठवडे बाजारातून कोरोना संक्रमणाची शक्यता वाढली आहे. स्थानिक ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कोरोनाचा वाढणारा धोका लक्षात घेऊन संबंधित आठवडे बाजार कंत्राटदाराला सूचना देऊन नियमांचे पालन करण्याची सूचना करण्याची मागणी केली जात आहे.
आठवडे बाजारात नो मास्क नो फिजिकल डिस्टन्सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:27 AM