लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत सालेकसा येथील सहकारी संस्थेने खरीप हंगामात धान खरेदी केली. मात्र सदर सहकारी संस्थेच्या गोदामात खरेदी केलेल्या धानापेक्षा कमी धान असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशी सुरू करण्यात आली. संस्थेच्या गोदामात नेमके धान बरोबर आहे किंवा कमी याची चौकशी करण्यासाठी मागील बारा दिवसांपासून धानाची उचल करुन वजन करणे सुरू आहे. संस्थेच्या नोंदणी रजिस्टरनुसार आता केवळ गोदामातील आठ हजार क्विंटल धानाचे वजन होणे शिल्लक असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत धान खरेदी केली जाते. हे दोन्ही विभाग जिल्ह्यात ठिकठिकाणी शासकीय धान खरेदी सुरू करतात. यासाठी काही ठिकाणी सहकारी संस्थाशी करार करुन धान केली जाते. खरेदी केलेल्या धानाची भरडाईसाठी उचल होईपर्यंत सहकारी संस्थेच्या गोदामात साठवणूक ठेवली जाते. त्यानंतर राईस मिलर्सशी करार करुन सदर धानाची उचल केली जाते. यंदा खरीप हंगामा दरम्यान सालेकसा येथील सहकारी संस्थेच्या माध्यमातून १ लाख ४० हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी ६९ हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली. त्यामुळे संस्थेच्या गोदामात ६१ हजार क्विंटल धान शिल्लक असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात संस्थेच्या गोदामात ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कांदबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांनी याची गांर्भियाने दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशी होईपर्यंत गोदामाला सील ठोकण्याचे निर्देश दिले होते. त्यांनतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनचे महासंचालक कोक आणि भंडाºयाचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी गणेश खर्चे यांचा समावेश असलेली चौकशी समिती गठीत करण्यात आली. या समितीने धानाची गोदामातून उचल करुन वजन केल्याशिवाय धान कमी अथवा जास्त आहे हे सांगता येत नाही. त्यामुळे धानाचे वजन करण्यासाठी धानाची उचल करण्याची परवानगी मागीतली.जिल्हाधिकाºयांची परवानगी मिळाल्यानंतर मागील बारा दिवसांपासून गोदामातील धानाची उचल करण्यास सुरूवात करण्यात आली. संस्थेच्या नोंदणी रजिस्टरनुसार आता गोदामात ८ हजार क्विंटल धान शिल्लक असून तेवढ्याच धानाचे वजन होणे शिल्लक असल्याचे चौकशी समितीच्या अधिकाºयांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.आठ दिवसात देणार अहवालसालेकसा येथील सहकारी संस्थेच्या गोदामातील धानाची पूर्ण उचल होण्यास पुन्हा चार पाच दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण धानाचे वजन करुन त्याचा संपूर्ण चौकशी अहवाल जिल्हाधिकारी व मार्केटिंग फेडरेशनला पाठविण्यात येणार आहे. यासाठी जवळपास आठ दिवस लागण्याची शक्यता असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.अहवालाकडे जिल्हावासीयांचे लक्षसहकारी संस्थेच्या गोदामात तब्बल ५० हजार क्विंटल धान कमी असल्याची तक्रार झाल्यानंतर हा मुद्दा जिल्हाभरात चांगलाच गाजला. त्यानंतर याप्रकरणाचा चौकशी अहवाल जिल्हाधिकाºयांकडे लवकरच सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे या अहवालात चौकशी समितीला नेमके काय हाती लागले याकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
आठ हजार क्विंटल धानाचे वजन होणे बाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 9:48 PM
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत सालेकसा येथील सहकारी संस्थेने खरीप हंगामात धान खरेदी केली. मात्र सदर सहकारी संस्थेच्या गोदामात खरेदी केलेल्या धानापेक्षा कमी धान असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशी सुरू करण्यात आली.
ठळक मुद्देसालेकसा येथील धान खरेदी घोळ : चौकशी अंतीम टप्प्यात, इतर केंद्रावरही प्रश्न चिन्ह