लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने आठवडाभरापूर्वी जिल्ह्यातील गोरेगाव, तिरोडा, गोंदिया तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. मात्र या तालुक्यांसारखीच स्थिती उर्वरित पाच तालुक्यात आहे. मग त्यांना कुठल्या निकषांवर डावलण्यात असा संतप्त सवाल शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फार कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी ७० हजार हेक्टर क्षेत्र पडीक राहीले. तर पावसाचा खंड पडल्याने धानपिकांवर मोठ्या प्रमाणात कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे हजारो हेक्टरमधील पीक नष्ट झाले. कीडरोग नियंत्रणासाठी शेतकºयांनी धानपिकांवर महागड्या कीटकनाशकांची फवारणी केली. मात्र त्यानंतरही कीडरोग नियंत्रणात न आल्याने नवेगावबांध, बाराभाटी येथील काही शेतकºयांनी शेतातील उभे पीक जाळून टाकले. पावसाअभावी देवरी, सालेकसा, आमगाव, सडक-अर्जुनी, अर्जुनी मोरगाव या तालुक्यातील शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकºयांनी रक्ताचे पाणी करून व तलाव, विहिरीचे पाणी करुन कशी बशी पिके वाचविली. मात्र कीडरोगांमुळे हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ शेतकºयांवर आली. त्यामुळे यासर्वच तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. शेतकºयांची ओरड वाढल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले.मात्र शासनाने आठ दिवसांपूर्वीच गोरेगाव, तिरोडा, गोंदिया या तीनच तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. तसेच उपाय योजना राबविण्याचे निर्देश दिले. पण उर्वरित पाच तालुक्यांना यातून वगळल्याने शेतकºयांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष व्याप्त आहे. सरकार शेतकºयांच्या प्रश्नावर राजकारण करीत असल्याचा आरोप होत आहे. जी स्थिती या तालुक्यातील धानपिकांची आहे तीच स्थिती उर्वरित पाच तालुक्यातील धानपिकांची आहे. मग या तीन तालुक्यांना लागू केलेले निकष पाच तालुक्यांना का लागू होत नाही, असा सवाल देखील शेतकºयांकडून उपस्थित केला जात आहे.पिकांचे सर्वेक्षण सुरूधानपिकांवरील कीडरोगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश शासनाने दिले. यानंतर जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शेतांची पाहणी केली जात आहे. यासंबंधीचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. त्यानंतर शेतकºयांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.लोकप्रतिनिधींची सावध भूमिकाजिल्ह्यातीेल तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला. मात्र उर्वरित पाच तालुके यातून वगळल्याने शेतकºयांमध्ये रोष व्याप्त आहे. या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्याचे श्रेय घेतल्यास उर्वरित तालुक्यातील शेतकºयांचा रोष ओढावून घ्यावा लागेल. त्यामुळे कुणीच याचे श्रेय घेण्यासाठी पुढे आले नाही. एकंदरीत लोकप्रतिनिधींनी सावध पावित्रा घेतल्याचे चित्र आहे.वेगवेगळे अहवाल सादर केलेयंदा पावसाअभावी जिल्ह्यात पडीक राहिलेल्या क्षेत्रावरुन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्यात वाद निर्माण झाला होता. या दोन्ही विभागाने वेगवेगळे अहवाल सादर केले. त्यामुळे पडीक क्षेत्र आणि दुष्काळीस्थिती याबाबत संभ्रम निर्माण झाल्याची माहिती आहे. याच अहवालाचा फटका या पाच तालुक्यातील शेतकºयांना बसला.
तालुक्यांना कुठल्या निकषांवर डावलले ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 10:06 PM
राज्य सरकारने आठवडाभरापूर्वी जिल्ह्यातील गोरेगाव, तिरोडा, गोंदिया तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला.
ठळक मुद्देशेतकºयांमध्ये संताप : कृषी विभागाच्या अहवालाने घोळ