शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

शासकीय नोकरी म्हणजे ‘वेठबिगारी’ आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 9:45 PM

शासकीय नोकरी देताना जाचक अटी लावायच्या, सेवक प्रथा कंत्राटी नोकर अशा गोंडस नावाखाली तुटपुंज्या मानधनावर कर्मचाऱ्यांकडून सारी कामे करुन घ्यायची, अनेक नावाखाली त्यांच्या वेतनातून कपात करायची आणि कर्मचाऱ्यांचे बरे वाईट झाले तर हात वर करायचे म्हणजे शासन नोकरी देते की वेठबिगार समजून जुलूम करते, असा संतप्त सवाल मृत कर्मचाऱ्याच्या ७८ वर्षीय आई पदमीनबाई आरसुळे यांनी केला आहे.

ठळक मुद्देमृत कर्मचाऱ्याच्या आईचा संतप्त सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : शासकीय नोकरी देताना जाचक अटी लावायच्या, सेवक प्रथा कंत्राटी नोकर अशा गोंडस नावाखाली तुटपुंज्या मानधनावर कर्मचाऱ्यांकडून सारी कामे करुन घ्यायची, अनेक नावाखाली त्यांच्या वेतनातून कपात करायची आणि कर्मचाऱ्यांचे बरे वाईट झाले तर हात वर करायचे म्हणजे शासन नोकरी देते की वेठबिगार समजून जुलूम करते, असा संतप्त सवाल मृत कर्मचाऱ्याच्या ७८ वर्षीय आई पदमीनबाई आरसुळे यांनी केला आहे.कर्मचाºयांच्या जीवावर उठलेल्या अंशदायी पेन्शन योजनेच्या कचाट्यात सापडून मृत पावलेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबाची व्यथा सांगताना त्यांनी लोकमत जवळ आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील धमदीटोला शाळेत कार्यरत शिक्षक बालाजी तुकाराम आरसुळे यांचे २०१२ मध्ये अपघाती निधन झाले.वडिलांचे छत्र बालपणातच हरवल्यानंतर बालाजी आरसुळे यांनी अल्पवयातच कुटुंबांची जबाबदारी सांभाळत २२ व्या वर्षी शिक्षकाची नोकरी पत्करली. त्यातही तीन वर्षे तुटपुंज्या मानधनावर काम केले.२००९ ला सेवेत कायम झाले, पण २०१२ रोजी त्याचे दु:खद निधन झाले. घरी म्हातारी आई पदमीनबाई आरसुळे (७८), भाऊ गंगाधर व बहीण मनकरणाबाई असा परिवार आहे. कुटुंबाच्या जबाबदारी शिक्षक आरसुळे यांच्यावरच होती.त्यांचे पश्चात आई सावकारी कर्ज काढून दुसºया मुलाच्या मदतीने शेतात कापसाची पेरणी करते.पण अस्मानी संकटामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे.लोक सेवानिवृत्त होऊन देवदर्शनाला जातात. तिथे वयोवृद्ध पदमीनबाई पोटासाठी मुलाला साथ देत शेतात राबत आहे.कर्ता मुलगा गमावला परंतु शासनाकडून याची कुठलीच दखल घेतल्या गेली नाही. ऐवढेच काय कर्मचारी आरसुळे यांच्या वेतनातून कपात झालेल्या डीसीपीएस, गटविमा व इतर रकमांचा आजवर हिशोब नाही. उतारवयात स्वत:च जीव सांभाळायचा की शासकीय कार्यालयाच्या येरझºया मारायच्या असा यक्षप्रश्न तिच्यापुढे उभा आहे.कायद्यातील तरतुदींचे उल्लंघनवेठबिगार म्हणजे निराधार, दुर्बल, असंघटित व्यक्तीस योग्य मोबदला न देता राबवून घेणे त्या त्याकाळात त्यास इतरच काम करण्यास मनाई करणे,त्यास वेठीस धरुन बिगारासारखे काम करणे म्हणजे वेठ बिगार होय.भारतीय संविधान कलम २३ नुसार वेठ बिगारी बेकायदा ठरविण्यात आली असून वीस कलमी कार्यक्रमात वेठबिगार निर्मूलन व पुनर्वसनाचे निर्देश दिले आहेत.कुटुंब निवृत्ती वेतन लागू करावेशासकीय सेवेत असलेला मुलगा दगावल्यानंतरही शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.शासनाने याकडे लक्ष देवून वेतनातून कपात रक्कम व्याजासह द्यावी व कुटुंबीयांना कुटुंबनिवृत्ती वेतन लागू करावे.-पदमीनबाई आरसुळेमृत कर्मचाºयांची आई

टॅग्स :Governmentसरकार