शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

लेखा विभागाचा कारभार प्रभाऱ्यांवर

By admin | Published: June 16, 2017 1:02 AM

नगर परिषदेत लेखाधिकारी व लेखापरीक्षक पदावर रूजू झालेले सुधाकर काळे आल्या-आल्या लगेच वैद्यकीय रजेवर गेले आहेत.

लेखाधिकारी मेडिकलवर : लिपीक व रोखपालांकडे प्रभार लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेत लेखाधिकारी व लेखापरीक्षक पदावर रूजू झालेले सुधाकर काळे आल्या-आल्या लगेच वैद्यकीय रजेवर गेले आहेत. परिणामी लेखा विभागाचा कारभार सध्या प्रभारीवर चालत आहे. विभागातील लिपीक व रोखपालांकडे सध्या प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे आता साहेब कधी येतील याचा सध्या तरी काहीच नेम दिसून येत नाही. नगर विकास प्रशासनाने अवघ्या राज्यातच स्थानांतरणाची मोहीम राबवीली. यात गोंदिया नगर परिषदेतील राज्य संवर्गातील कर्मचाऱ्यांचे बाहेर स्थानांतरण करण्यात आले. कर्मचारी गेले तेवढे कर्मचारी नगर परिषदेत रूजू झाले नाहीत. मात्र रूजू झालेले कर्मचारी सुट्या टाकून आता पळ काढू लागले असल्याचे प्रकार नगर परिषदेत दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरणाने नगर परिषदेतील महत्वपूर्ण विभाग रिकमे झाले आहेत. अशातच नगर परिषदेच्या लेखा विभागातील लेखाधिकारी अग्निहोत्री यांचे स्थानांतरण झाले. अगोदरच लेखापरिक्षकांचे पद रिकामे होते. त्यामुळे अग्निहोत्री यांच्या जागेवर आलेले काळे यांना लेखाधिकारी व लेखापरिक्षक अशी नियुक्ती देण्यात आली. माहितीनुसार, २ जून रोजी काळे येथे रूजू झालेत. आता त्यांना नगर परिषदेचे वातावरण भावले नाही का काय झाले, मात्र ७ जून पासून ते वैद्यकीय रजेवर गेल्याची माहीती आहे. आता साहेबच सुट्टीवर गेले त्यामुळे विभागाचा कारभार विस्कळीत झाला. त्यामुळे रोखपाल दुबे यांच्याकडे सध्या लेखापरिक्षक व लिपीक जयप्रकाश भेंडारकर यांच्या लेखाधिकारी पदाचा प्रभार देण्यात आल्याची माहिती आहे. नगर परिषदेत अगोदरच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यात या स्थानांतरणाने अधिकच गोंधळ झाला असून पालिकेच्या कारभारावर परिणाम पडत आहे.