खातीया : तालुक्यातील ग्राम परसवाडा येथे सौर ऊर्जेवर चालणारी पाणी टाकी लावण्यात आली होती. ती पाणी टाकी २ ते ३ वर्षे चालली व नंतर बंद पडली असून आजपर्यंत तिची सुधारणा करण्यात आली नाही. सौर ऊर्जेवरील पाणी टाकी बंद पडून ६ ते ७ वर्षे निघून गेले. पण या संदर्भात संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून आले. या संदर्भात परसवाडा येथील सामाजिक कार्यकर्ता मनोहर भावे यांनी अनेकदा वरील अधिकाऱ्यांकडे पाणी टाकी सुरु करण्यासाठी निवेदन दिले. मात्र कोरोना काळात हे काही शक्य होऊ शकले नाही. यानंतर नुकतेच त्यांनी खंड विकास अधिकारी यांना निवेदन दिले. जेणेकरुन या उन्हाळ्याच्या काळात नागरिकांना पाण्याची गैरसोय होऊ नये. जर का सौर ऊर्जा पाणी टाकी त्वरित सुरु झाली नाही तर भावे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कधी सुरु होणार परसवाडा येथील सौर ऊर्जेची पाणी टाकी ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:26 AM