गाेरेगाव : तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी गोरेगाव येथे बस स्थानक तयार करण्यात आले, पण या बस स्थानकावर बसच थांबत नसल्याने, लाखो रुपये खर्चून हे बस स्थानक कशासाठी तयार केले, असा प्रश्न निर्माण होत आहे, तर बस स्थानकावर नेमकी बस थांबणार केव्हा, असा सवाल प्रवाशांनी केला आहे.
गोरेगाव
शहरात पंचायत समिती समिती आणि पोलीस स्टेशनला लागून सात आठ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बस स्थानकाची नव्या इमारतीची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला या बस स्थानकावर बसचा थांबा होता, पण आजघडीला या बस स्थानकावर बस जात नाही. थांबाही नाही, तालुक्यातील सर्व प्रवासी शहरातील मुख्य चौकात रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहतात. या मुख्य चौकात प्रवाशांना साधी बसायचीही व्यवस्था नाही. सध्या शहरात रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. यातच वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाने बस स्थानक लवकर चालू करावे, अशी मागणी अंकित रहांगडाले यांनी केली आहे.