लोकमत न्यूज नेटवर्क शेंडा-कोयलारी : येथील तेंदूपत्ता संकलन केंद्रावर सन २०१५ मध्ये तेंदूपत्ता गोळा करण्यात आला होता. त्याचे बोनस आजपावेतो मजुरांना मिळाले नाही. त्यामुळे मजूरवर्गात रोष आहे. तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांना दरवर्षी वनविभागाकडून बोनस दिले जाते. बोनसची रक्कम थेट मजूरांच्या खात्यात जमा केली जाते. परंतु सन २०१५ पासून आजपावेतो बोनसची रक्कम जमा झालीच नाही. त्यामुळे तर्कविर्तकाना पेव फुटले आहे. शासन तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजूरांना तेंदूपत्ताच्या मजूरी व्यतिरीक्त अधिकची रक्कम बोनसच्या स्वरुपात देते. त्यामुळे मजूरांच्या आर्थिक अडचणीत हातभार लावल्यासारखे होते. परंतु मागील दोन वर्षाचे बोनस थकीत असल्यामुळे संभ्रम निर्माण झाले आहे.
मजुरांना तेंदूपत्ता बोनस केव्हा मिळणार
By admin | Published: June 25, 2017 1:02 AM