शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गणिताची पुस्तके केव्हा मिळणार?

By admin | Published: August 19, 2014 11:48 PM

संपूर्ण जिल्ह्यात शाळा सुरू होवून जवळ-जवळ दोन महिने पूर्ण होत आहेत. पण बहुतेक शाळांमध्ये विविध विषयांचे पुस्तकेच उपलब्ध न झाल्याची बाब आता पुढे आली आहे.

सडक/अर्जुनी : संपूर्ण जिल्ह्यात शाळा सुरू होवून जवळ-जवळ दोन महिने पूर्ण होत आहेत. पण बहुतेक शाळांमध्ये विविध विषयांचे पुस्तकेच उपलब्ध न झाल्याची बाब आता पुढे आली आहे. सदर प्रतिनिधीने तालुक्यातील मनेरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली. या शाळेत वर्ग चौथीमध्ये नऊ विद्यार्थी आहेत. पण गणित या विषयाचे नऊ विद्यार्थ्यांसाठी केवळ दोनच पुस्तके मिळाल्याची माहिती मुख्याध्यापकांनी दिली आहे. याच केंद्रातील बावनकुळे यांच्या भेटीत कनेरी/राम या गावातील शाळेत गणित विषयाची माहिती जाणून घेतली असता वर्ग चौथीमध्ये १४ विद्यार्थी असून कनेरी शाळेला जि.प.कडून फक्त दोन पुस्तके मिळाल्याची माहिती दिली. ही गंभीर समस्या लक्षात घेवून सदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी दुसऱ्या शाळेतून पुस्तके मागवून मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही. पण जिल्हा परिषदेच्या शाळांतील या मुलांचा शैक्षणिक खेळखंडोबा झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांचे पालकही त्रासले आहेत. तालुक्यातील काही केंद्रात मराठी माध्यमांच्या शाळांना इंग्रजी विषयाच्या पुस्तका देऊन आता मोकळे झाल्याचे दिसत आहे. विविध विषयांच्या पुस्तकांचा तुटवड्याची तालुक्यातील इतर केंद्रातही हिच परिस्थिती असल्याचे एका शिक्षकाने सांगितले आहे. दोन महिने होऊनही त्या मुलांना पुस्तके मिळाली नाही तर पुढे पुस्तके केव्हा मिळातील? हा संशोधनाचा विषय ठरत आहे. विषयांची पुस्तके न मिळाल्याने त्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, हा प्रश्न निर्माण होत आहे. पुस्तकांच्या तुटवड्याचा हा गंभीर प्रश्न पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी उपस्थित करून गोर-गरीब जनतेच्या मुलांना वेळेवर पुस्तका देण्याची सोय करावी, अशी मागणी होत आहे. पण कोणताही नेता या समस्येकडे लक्ष देत नसल्याची माहिती पुढे येत आहे. केंद्रप्रमुख बावनकुळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, या समस्येची माहिती जि.प. गोंदियाला लेखी स्वरूपात दिली आहे. पण अजूनपर्यंत पुस्तका न पाठविल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. (शहर प्रतिनिधी)