युवकांना रोजगार केव्हा देणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:11 PM2018-11-11T22:11:16+5:302018-11-11T22:11:46+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच क्षेत्राचे खासदार व आमदारांनी सुद्धा या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते.

When will the youth give employment? | युवकांना रोजगार केव्हा देणार?

युवकांना रोजगार केव्हा देणार?

Next
ठळक मुद्देसहषराम कोरोटे : मुंडीपार येथे ओपन कबड्डी स्पर्धेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच क्षेत्राचे खासदार व आमदारांनी सुद्धा या क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही सर्व आश्वासने पूर्णपणे फोल ठरली आहेत.
आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये अद्यापही एक मोठा उद्योग सुरू झाला नाही. तर पर्यटन स्थळांचा सुध्दा विकास झालेला नाही. हे सरकार केवळ घोषबाज सरकार असून युवकांना रोजगार केव्हा उपलब्ध करुन देणार असा सवाल काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांनी केला. सालेकसा तालुक्यातील मुंडीपार येथील जि.प. शाळेच्या पटांगणावर शनिवारी (दि.१०)ओपन कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
जय बजरंग कबड्डी क्रीडा मंडळ मुंडीपारच्यावतीने आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि माजी मंत्री भरत बहेकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
या प्रसंगी सालेकसाचे सभापती अर्चना राऊत, जि.प.सदस्य विजय टेकाम, मुंडीपारच्या सरपंच मंजू राऊत, उपसरपंच उषा नागपुरे,यादवलाल बनोटे, वसंत पुराम, बळीराम कोटवार, माजी सरपंच घनशाम नागपुरे, किरण वाघमारे, माजी उपसरपंच बलीराम बसोने, तंटामुक्ती अध्यक्ष रेखमचंद उपराडे, माजी ग्रा.पं.सदस्य अमरचंद जमदाड, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दयाराम चोडाये, सहायक शिक्षक कोरे, कुंभरे, दमाहे, ढेकवार यांच्यासह मुंडीपार परिसरातील क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
या वेळी भरत बहेकार यांनी, वर्तमान भाजप सरकार शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व सर्व सामान्याच्या हिताचे नाही. केवळ विकासाचे मोठी आश्वासन देणारे सरकार असल्याचा आरोप केला. उपस्थित मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व संचालन मंडळाचेअध्यक्ष गुमानसिंग उपराडे यांनी केले तर आभार माजी सरपंच घनशाम नागपुरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष गुमानसिंग उपराडे,उपाध्यक्ष महेश वाघमारे,सचिव सुकदास लिल्हारे व कोषाध्यक्ष ईश्वर नागपुरे यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.

Web Title: When will the youth give employment?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.