पाच दिवसांपूर्वीच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मनमर्जी कारभाराविरोधात चारही विद्यमान आमदारांनी गंभीर आरोप केले. सीईओ लोकप्रतिनिधींना सुद्धा जुमानत नसल्याने दोन आमदारांनी याची थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. जि.प.ची निवडणूक लांबणीवर गेल्याने जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकराज सुरू आहे. याचाच सीईओ फायदा घेत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यातच आता ग्रामसेवकांवरील निलंबनाच्या कार्यवाहीला घेऊन ग्रामसेवक संघटनेने सुद्धा सीईओंविरोधात दंड थोपाटले असून, असहकार आंदोलन सुरू केले आहे. सीईओंना पदावरून दूर करून चौकशीची मागणीसुद्धा त्यांनी केली. सीईओंवर एकापाठोपाठ एक आरोप होत, त्यामुळे नक्कीच पाणी कुठेतरी मुरत आहे. जिल्हा परिषदेत सध्या ‘हम करे सो कायदा’ सुरू असल्याची कुजबुज जि.प.च्या वर्तुळात आहे.
कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:34 AM