लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : फ्लॅट किंवा सोसायटीत घर घेतल्यानंतर अनेकजण कायदेशीर प्रक्रियेची फारशी माहिती घेत नाहीत. कायदेशीर मालकीसाठी डीम्ड कन्व्हेयन्स आवश्यक आहे. मात्र, अनेक फ्लॅट किंवा सोसायट्यांनी डीम्ड कन्व्हेयन्सची नोंदणी केली नसल्याने खरेदीदार खरंच मालक आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपण खरेदी करत असलेल्या फ्लॅट किंवा सोसायटीचे डीम्ड कन्व्हेयन्स झाले की नाही, याची खातरजमा करणे गरजेचे आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) अत्यंत महत्त्वाचे ठरते.
यामुळे जमीन मालक-मालमत्ता विकासकाकडून सहकारी गृहनिर्माण सोसायटीला मालमत्तेची कायदेशीर मालकी मिळू शकते. सोसायटीला पुनर्विकासाचा पूर्ण अधिकार मिळतो. सर्वच हक्क सोसायटीकडे गेल्याने जमीनमालक किंवा विकासकाला पुन्हा त्या जमिनीवर दावा करता येत नाही.
जिल्ह्यात गृहनिर्माण सोसायट्या अत्यल्पजिल्ह्यात गृहनिर्माण सोसायट्या नाहीच्या बरोबरच आहेत. मात्र, फ्लॅटचे सर्वत्र जाळे पसरत असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या चौफेर फ्लॅट दिसून येतात.
डीम्ड कन्व्हेयन्स करणे आवश्यक का असते ?सोसायटीच्या स्वायत्त हक्कांसाठी, पुनर्विकास आणि आर्थिक व्यवहारांसाठी, कायदेशीर गुंतागुंती टाळण्यासाठी, सोसायटीला मालमत्तेची कायदेशीर मालकी मिळण्यासाठी.
प्रक्रिया पूर्ण होण्यास किती कालावधी लागतो?डीम्ड कन्व्हेयन्सचे प्रकरण अर्धन्यायिक स्वरूपाचे असल्याने, ते दाखल झाल्यानंतर सर्व संबंधितांची सुनावणी घेतल्यानंतरच निर्णय दिला जातो. साधारण या प्रक्रियेला दोन ते चार महिने लागू शकतात.
साहेब, डीम्ड कन्व्हेयन्स म्हणजे नेमके काय?सोसायटीच्या नावावर जमिनीची थेट मालकी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेयन्स) म्हणतात.बिल्डर सहकार्य करत नसेल तर सरकार स्वतः ही प्रक्रिया पूर्ण करते. अद्यापही डीम्ड कन्व्हेयन्सबाबत जनजागृती झालेली नाही. अनेकांना तर याबाबतची माहिती नसल्याचे दिसून येते. यामुळे अनेकांची फसगतही झाली आहे.