शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

चाबी कुणाचे कुलूप लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2021 5:00 AM

गोंदिया जिल्हा परिषदेत मागील पाच वर्षे काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता होती. या युतीवरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले तरी ती पाच वर्षे सुरळीतपणे कायम होते; पण यावेळेचे चित्र वेगळे आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडीची सत्ता आहे, तर या तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढविली. यंदाच्या निवडणुकीचे चित्र निश्चितच वेगळे राहणार आहे.

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ओबीसी प्रवर्गाच्या एकूण ३० जागा वगळून जि.प.च्या ४३ आणि पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक  पार पडली. या निवडणुकीत प्रथमच गोंदिया विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार यांच्या चाबी संघटनेने जि.प.च्या १४, तर पंचायत  समितीच्या सर्वच जागा लढविल्या होत्या. गोंदिया तालुक्यात चौरंगी लढत झाल्याने आणि या तालुक्यात जो बाजी मारेल त्याला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे चाबी कुणाचे कुलूप लावणार हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चाबीच्या कुलूप लावण्यावरच फुलांची उधळण आणि घड्याळाची टिकटिक वाजण्याचे समीकरण बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत मागील पाच वर्षे काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता होती. या युतीवरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले तरी ती पाच वर्षे सुरळीतपणे कायम होते; पण यावेळेचे चित्र वेगळे आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडीची सत्ता आहे, तर या तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढविली. यंदाच्या निवडणुकीचे चित्र निश्चितच वेगळे राहणार आहे. जिल्हा परिषद ४३ आणि पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी जागा सर्वसाधारण करून त्यासाठी १८ जानेवारीला निवडणूक होत आहेत. यात  जिल्हा  परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा झेंडा हे ठरविण्यात या १० जागा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या दहा जागांच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. २१ तारखेला पार पडलेल्या १२९ जागांच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या निवडणुकीत बहुतेक सर्वच ठिकाणी त्रिशंकू लढती झाल्या. त्यामुळे कुठे हात सोबत तर कुठे घड्याळाची टिकटिक, तर काही ठिकाणी फुलांची उधळ होणे निश्चित आहे. या निवडणुकीत ७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने याचा विजयाचा समीकरणावर निश्चित परिणाम होणार आहे. मात्र,  गोंदिया तालुक्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि चाबी असा चौरंगी सामना झाला. त्यामुळे चाबी ज्यांचे कुलूप लावील त्याचा तेवढाचा फायदा फूल उमलण्यास आणि घडीची टिकटिक वाजण्यास होणार आहे. त्यामुळे याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जिल्हा परिषदेत कोण होणार प्लस आणि मायनस- मागील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २० जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर काँग्रेस १६ आणि भाजपने १७ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सहज सत्ता स्थापन करू शकले असते. पण स्थानिक बंगाल आणि गल्लीचे राजकारण यात आडवे आल्याने काँग्रेसने कमळ हातात घेत अभद्र युती करीत सत्ता स्थापन केली होती. पण यंदाचे समीकरण वेगळे आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत कोण मायनस आणि कोण प्लस होतो याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. १० जागांवर बरेच समीकरण अवलंबून - ओबीसी प्रवर्गाच्या सर्वसाधारण करण्यात आल्या आहेत. यात जिल्हा परिषदेच्या केशोरी, इटखेडा, माहुरकुडा, महागाव, बोंडगावदेवी, पांढरी, ठाणा, घाटटेमणी, किकरीपार, निंबा जागांचा समावेश आहे. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने या दहा जागा फारच महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे या दहा जागांकडे सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. 

कोण किती पाण्यात कळणार १९ ला - जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ आणि पंचायत समितीच्या १०६ जागांची एकत्रित मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे निकालानंतरच कोण किती पाण्यात हे स्पष्ट होणार आहे. नेत्यांनी मांडले पक्षश्रेष्ठींसमोर अंकगणित - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या १२९ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक पार पडली. यात ७० टक्के मतदान झाले. यानंतर प्रत्येक पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार कोणत्या क्षेत्रात प्लस आणि मायनस राहू शकतो याची आकडेमोड करुन अंक गणित सादर केल्याची माहिती आहे.  

सर्वच म्हणतात आम्हीच सरस, मतदार म्हणतात आमच्याकडे गुपित 

- स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेची निवडणूक ही महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. २१ डिसेंबरला निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आम्हीच सरस असल्याचा दावा केला. पण कोण सरस याचे गुपित मतदारांनाच माहिती असल्याने ते काय निर्णय देतात हे १९ जानेवारीला मतपेट्यांचा पिटारा उघडल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद