लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महिलाओ के सन्मान मे भाजप सरकार मैदान मे असा नारा भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिला होता. मात्र प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर महिलांच्या सन्मानार्थ एकही काम केले नाही. एकीकडे महिलांच्या सन्मानाची भाषा करणारे गॅस सिलिंडर आणि पेट्रोल व डिझेलची दरवाढ करुन गृहीणींना महागाईच्या खाईत लोटण्याचे काम करीत आहे. महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या मोदी सरकारनेच आता गॅस सिलिंडरचे दर ८०० रूपयांवर का वाढविले याचे उत्तर द्यावे असा सवाल वर्षा पटेल यांनी केला.काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी (दि.२) तुमसर तालुक्यातील बपेरा,वाहणी, सिलेगाव, मोहगाव येथे आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या. वर्षा पटेल म्हणाल्या, भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही. त्यामुळे मोदी सरकारकडून सर्वसामान्य जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. कर्जमाफी आणि अनुदान देण्याच्या नावावर महिला आणि शेतकऱ्यांना रांगेत उभे करुन त्यांचा मानसिक छळ करण्याचे काम मोदी सरकारने केले. महागाई, बेरोजगारी अशी दुहेरी संकटाला जनतेला तोंड द्यावे लागत आहे. मोदी सरकारच्या जनहित विरोधी धोरणामुळे जनता त्रस्त झाली असून या निवडणुकीत जनता या सरकारला त्यांची योग्य जागा दाखवून देवून धडा शिकवेल असे सांगितले. भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.
मोदी सरकारने गॅस सिलिंडरचे दर का वाढविले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 11:52 PM
महिलाओ के सन्मान मे भाजप सरकार मैदान मे असा नारा भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिला होता. मात्र प्रत्यक्षात सत्तेवर आल्यानंतर महिलांच्या सन्मानार्थ एकही काम केले नाही. एकीकडे महिलांच्या सन्मानाची भाषा करणारे गॅस सिलिंडर आणि पेट्रोल व डिझेलची दरवाढ करुन गृहीणींना महागाईच्या खाईत लोटण्याचे काम करीत आहे.
ठळक मुद्देमहिलांचा सन्मान केवळ मतांपुरताच : वर्षा पटेल यांची प्रचार सभा