नरेश राहिले
गोंदिया : आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यासाठी दहावीनंतर कमीत कमी वेळात मिळविण्यासाठी रोजगार औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे आयटीआय हा महत्त्वाचा पर्याय मानला जात होता; पण आता कौशल्याभिमुख शिक्षण म्हणून चांगली प्रतिष्ठा लाभली आहे. विद्यार्थ्यांचा ओढा त्यामुळे आयटीआयकडे वाढला आहे.
गोंदिया जिल्ह्यात खासगी व सरकारी मिळून १७ आयटीआय आहेत, यात १००० च्या वर जागा आहेत. जिल्ह्यात १० च्या जवळपास खासगी आयटीआय आहेत. प्रत्येक संस्थेमध्ये वेगवेगळ्या ट्रेडसह १००० च्या वर जागा आहेत. गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये शासकीय अनुदानित आयटीआयमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जागा उपलब्ध आहेत.
ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करा
- गोंदिया शहरात ३, तर प्रत्येक तालुक्यात अनुदानित आयटीआय आहेत. १० च्या घरात खासगी आयटीआय आहेत.
- जिल्ह्यात शासकीय आयटीआयमध्ये एकूण २४ ट्रेड आहेत. या संस्थांच्या कोणत्याही ट्रेडमध्ये प्रवेश करण्यासाठी यावेळी केवळ ऑनलाइन प्रक्रिया उपलब्ध आहे.
- विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करून परिपूर्ण माहितीसह अर्ज करायचा आहे. त्यानंतरच प्रवेश निश्चित होईल.
या संकेतस्थळावर सर्व माहिती
अधिक माहिती admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
जिल्ह्यात ८ शासकीय आयटीआयला १६९५ जागा
गोंदिया जिल्ह्यात ८ शासकीय आयटीआयला १८९५ जागा आहेत. यात विविध प्रकारचे कोणकोणते ट्रेड उपलब्ध आहेत, जागा, अर्ज प्रक्रिया, राउंड आणि प्रवेश निश्चिती ते प्रवेशप्रक्रिया या संकेतस्थळावरूनच चालणार आहे.
जिल्ह्यात ९ खासगी आयटीआय, जागा ४४०
गोंदिया जिल्ह्यात प्रमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह ९ खासगी आयटीआय आहेत. या खासगी आयटीआयसह प्रवेश क्षमता ४४० आहे.
१७ जूनपासून आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे व १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. संकेतस्थळावर लॉग इन करून नवीन नोंदणी करावी. पुन्हा लॉग इन करून अर्ज भरावा.
विद्यार्थ्यांचा ओढा ‘इलेक्ट्रिशियन’कडे
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात असले तरी गोंदिया जिल्ह्यात ‘इलेक्ट्रिशियन ट्रेडकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल आहे. अन्य ट्रेडला विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद त्या तुलनेत कमी आहे.