शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

आता फ्लॅटमध्ये पेटवायच्या का चुली? गॅस दरवाढीने गृहिणी संतापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 5:00 AM

गॅस सिलिंडर भडकल्याने आता गॅस सोडून चुलीवर स्वयंपाक करायची पाळी गृहिणींवर आली आहे. विशेष म्हणजे, सिलिंडरच्या दरवाढीमुळे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी पुन्हा चूल पेटविण्यास सुरूवात केली आहे. मात्र शहरात ते शक्य नसल्याने आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या काय? असा सवाल संतापलेल्या गृहिणी करीत आहेत. मागील ‌वर्षभरापासून सातत्याने महागाई वाढत चालली असून सोबतच गॅस सिलिंडरचे त्यामुळे भरमसाट वाढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काहीच दिवसांपूर्वी २५ रूपयांनी महागलेल्या गॅस सिलिंडरचे दर बुधवारी (दि.१) आणखी २५ रूपयांची वाढविण्यात आले आहे. यामुळे आता घरगुती वापराचा १४ किलोचा सिलिंडर ९५५ रूपयांचा झाला असून सातत्याने होत असलेली दरवाढ बघता गृहिणी चांगल्याच संतापल्या आहेत. पेट्रोल-डिझेल सोबतच अन्य वस्तूंची वाढत चाललेली महागाई आता सर्वसामान्यांना चांगलीच होरपळत आहे. अशात गॅस सिलिंडर भडकल्याने आता गॅस सोडून चुलीवर स्वयंपाक करायची पाळी गृहिणींवर आली आहे. विशेष म्हणजे, सिलिंडरच्या दरवाढीमुळे उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी पुन्हा चूल पेटविण्यास सुरूवात केली आहे. मात्र शहरात ते शक्य नसल्याने आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या काय? असा सवाल संतापलेल्या गृहिणी करीत आहेत. मागील ‌वर्षभरापासून सातत्याने महागाई वाढत चालली असून सोबतच गॅस सिलिंडरचे त्यामुळे भरमसाट वाढले आहेत. सिलिंडर आता हजार रूपयांच्या घरातच पोहचल्याने सर्वसामान्यांनी सिलिंडर कसा खरेदी करायचा असा प्रश्न पडत आहे. महागाई नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. 

 सबसिडी किती भेटते रे भाऊ 

- घरगुती वापराच्या सिलिंडरवर ग्राहकांना शासनाकडून ४६ रूपये सबसिडी दिली जाते. मात्र या तुलनेत सिलिंडर ९३० रुपयांवर पोहचले होते. आता बुधवारी त्यात आणखी २५ रूपयांची वाढ झाली असून सिलिंडर ९५५ रूपयांवर पोहचले आहे. म्हणजेच, सिलिंडरचे दर आवाक्याबाहेर जात असतानाच त्यावर दिली जाणारी सबसिडी मात्र अत्यंत मोजकीच आहे. 

व्यावसायिक सिलिंडरही महागले - घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर भडकले असतानाच व्यावसायिक सिलिंडरचे दर सुद्धा वाढविण्यात आले आहेत. सध्या १,७९७ रूपयांचा असलेला व्यावसायिक सिलिंडर ७० रूपयांनी महागला असून त्याची किंमत आता १,८६७ रूपये झाली आहे. परिणामी एकीकडे गृहिणी संतापलेल्या असतानाच व्यापारीही सिलिंडर दरवाढीमुळे चांगलेच त्रस्त झाले असून त्यांच्यातही रोष दिसून येत आहे. 

महिन्याचे गणित कोलमडले 

लॉकडाऊनने अगोदरच सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. त्यात सातत्याने महागाई वाढत असून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची दरवाढ झाल्याने आता सिलिंडर ९५५ रुपयांना मिळणार आहे. सततच्या महागाईने आता घर चालविणे कठीण झाले आहे. शासनाने महागाई नियंत्रणात आणून सिलिंडरचे दरही कमी करावे. - कविता चौधरी (गृहिणी) 

उज्ज्वल भविष्यासाठी सुरू केलेली योजना सिलिंडरच्या सततच्या दरवाढीने मातीमोल ठरली आहे. सिलिंडरचे दर ९५५ रूपये झाले असून ते आता आवाक्याबाहेर गेले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. करिता शासनाने ही दरवाढ नियंत्रणात आणावी व सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार नाही याची दक्षता घ्यावी. - कल्पना देवतारे (गृहिणी)

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर