अर्जुनी मोरगाव : शहरातील प्रभाग ४ मधील निर्मला पांडुरंग मडावी या विधवा महिलेवर उपासमारीची वेळ आली होती. व्यवसायाने शिवणकाम करणाऱ्या पतीच्या निधनानंतर या महिलेवर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न होता. मोलमजुरी करून दोन मुलींचा पालन-पोषण यातही एक मुलगी ती सुद्धा विकलांग. अशा विपरित परिस्थितीमध्ये टाळेबंदी झाली आणि रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. शहरातील अंबिका वस्त्रालय प्रतिष्ठानचे संचालक श्यामू जीवानी धावून आले. त्यांनी या विधवा महिलेस मदतीचा हात दिला.
कोरोनामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे असह्य झाले. या महामारीने जगाला वेठीस धरले. लॉकडाऊनमुळे लाखों कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. कित्येकांचे रोजगार गेले, व्यापार,व्यवसाय डबघाईस आले. मागील वर्षीच्या लॉकडाऊन कसाबसा काढला, मात्र लगेच दुसऱ्या लॉकडाऊनने अनेकांचे हाल होत आहे. गरीब मजूर वर्गाला दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले. अशातच शहरातील प्रभाग ४ मधील निर्मला पांडुरंग मडावी या विधवा महिलेवर उपासमारीची वेळ आली होती. व्यवसायाने शिवणकाम करणाऱ्या पतीच्या निधनानंतर या महिलेवर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न होता. मोल मजुरी करून दोन मुलींचा पालन-पोषण यातही एक मुलगी मानसिक रूपाने विकलांग. अशा विपरित परिस्थितीमध्ये टाळेबंदी झाली आणि रोजीरोटीचा प्रश्न गंभीर झाला. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी त्रस्त होऊन मुलींसह अक्षरशः भीक मागण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय उरला नव्हता. पण म्हणतात ना देव उपाशी जागविली मात्र उपाशी झोपू देणार नाही. चंद्रमौळी झोपडीत राहणाऱ्या या विधवा महिलेच्या मदतीला शहरातील अंबिका वस्त्रालय प्रतिष्ठानचे मालक श्यामू जीवानी धावून आले. जीवानी कुटुंबीयांनी अन्नधान्य, किराणा साहित्य आणि रोख रक्कमेचे सहकार्य करीत ‘आम्ही आहोत हिम्मत हारु नका’ असे धीर दिला दिले. संकटाच्या काळात वेळीच धावून येत मदतीचा हात दिल्याबद्दल निर्मला मडावी यांनी जीवानी कुटुंबीयांचे आभार मानले.