सुखद प्रवास : स्मार्ट फोनधारक प्रवाशांना मनोरंजनाची सोयलोकमत न्यूज नेटवर्कबाराभाटी : राज्य परिवहन महामंडळाकडून काही दिवसांपूर्वी प्रत्येक बसमध्ये वायफायची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व स्मार्टफोन धारकांंसाठी बसमध्ये मनोरंजनाची सोय झाल्याने त्यांचा प्रवास सुखद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.दळणवळणाच्या साधनांपैकी विमान, रेल्वे व एसटीमध्ये मनोरंजनाच्या सोयी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथील प्रवासी थकलेले दिसून येत नाही. बसमध्ये मोफत मनोरंजनासाठी किवि वायफायची सोय झाली आहे. त्याद्वारे बसमध्ये स्मार्टफोनधारक जगातला कोणताही कार्यक्रम पाहून मनोरंजन करून घेवू शकतो. यात बातम्या, चित्रपट, ध्वनीफित गाणे, दिसणारे गाणे, कथा, कादंबरी किंवा एखाद्या पुस्तकाचे वाचनही करू शकतो. क्रिकेटसारखे सर्वच खेळ बघू शकतो. ऐतिहासिक, पौराणिक, प्रेमकथा, नाटक तसेच कोणत्याही कार्यक्रमाचा आढावा वृत्तांत पाहू शकतो. प्रत्येकवेळी क्षणाक्षणात बातम्यांमद्वारे माहिती मिळविता येते. स्पर्धा परीक्षार्थ्यांना स्पर्धेसंबंधी जाहिराती, प्रवेश पत्र तसेच नवीन पुस्तकांची माहिती मिळवता येते. लहान बालकांसाठी कार्टून, व्हिडिओ गेम, कॉमिक्स बुक्स आपण मिळवू शकतो. स्त्रियांसाठी आॅनलाईन सामान, कपडे किंवा उपयोगी साहित्य मिळविता येतात. अशा अनेक गोष्टी एसटीच्या वायफायमुळे प्रवाशांना शक्य झाल्या आहेत. या सुविधेमुळे जनता सुखाचा प्रवास करताना दिसते. बसमध्ये वायफाय पेटी लागणे आवश्यक होते. आता मोबाईल चार्ज करण्याची सुविधा व्हावी. आरक्षणाची जागा आरक्षणकर्त्यांना द्याव्यात. अशा अनेक सुविधा एसटी महामंडळाकडून अपेक्षित आहेत.एसटीमध्ये असे वापरावे वायफायआपले स्मार्टफोन उघडा व सेटिंगमधून वायफाय कनेक्ट करा. वायफाय डब्ल्यूएलएएन (व्लॅन) सुरू करा व यादीमध्ये किवि यावर जावे. सेटिंगमधून बाहेर या, ब्राऊजर उघडा. ब्राऊजरवर इंग्रजीमध्ये वूट.कॉम टाईप करून एन्टर करा, लगेच चालू होतो. आरामात बसा व मनोरंजनाचा आनंद घ्या.
एसटी बस प्रवासाला वायफायची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2017 12:48 AM