शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

वन्यजीवांच्या संरक्षणाची चळवळ उभी व्हावी

By admin | Published: January 15, 2017 12:19 AM

देशात वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जाणीव उशिरा रुजली आहे. १९८२ च्या वन कायदयामुळे जंगलाच्या संरक्षणाला सुरु वात झाली आहे

 अभिमन्यू काळे यांचे आवाहन : गोंदिया फेस्टीवलनिमित्त छायाचित्र कार्यशाळा गोंदिया : देशात वन्यजीवांचे संरक्षण करण्याची जाणीव उशिरा रुजली आहे. १९८२ च्या वन कायदयामुळे जंगलाच्या संरक्षणाला सुरु वात झाली आहे. केवळ जंगलात वन्यजीवांचे फोटो काढण्यापूरतेच काम मर्यादित न ठेवता वन्यजीवांच्या संरक्षणाची चळवळ उभी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले. गोंदिया फेस्टीवलनिमित्त आयोजीत फोटोग्राफी वर्कशॉपचे उद्घाटन करताना ते बोलत होते. याप्रसंगी उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, प्रसिध्द आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर प्रमुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना काळे यांनी, जंगले ही आपल्याला आनंद देणाऱ्या वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने आहेत. जंगलातील पशूपक्षांचे संरक्षण आणि संवर्धन कशाप्रकारे करता येईल यादृष्टीने काम झाले पाहिजे. गोंदिया फेस्टीवलच्या माध्यमातून सारस संवर्धनासोबतच सेंद्रीय शेतीची चळवळ उभारावी लागणार असल्याचे सांगत जिल्हाधिकारी काळे यांनी, सेंद्रीय शेती आणि वन्यपशू पक्षी यांचा जवळचा संबंध आहे. शेतातील उत्पादनासाठी करण्यात येत असलेल्या रासायनिक खते आणि औषंधाचा वापर आज वन्यपशू पक्षांच्या जीवावर उठला आहे. या खत व औषधांच्या वापरामुळे पशुपक्षांचे खाद्य कमी होत आहे. त्यामुळे स्थलांतरीत पक्षी जिल्हयात तलावांवर हळूहळू कमी येतील. त्यामुळे त्यांचा अधिवास वाढविणे गरजेचे आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. जिल्हयातील १२ ते १५ तलावांच्या परिसरात पक्षांचा अधिवास वाढविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येईल असे सांगीतले. यासाठी तलावांच्या परिसरातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. पक्षीनिरीक्षणासाठी या तलावाच्या परिसरात मनोरे उभारले जातील. होम स्टेच्या दृष्टीने ग्रामस्थांना या चळवळीत सहभागी करु न घेण्यात येईल. त्यामुळे त्यांनाही वाटेल की आपला गाव परिसरात बाहेरच्या लोकांना यायला आवडते. निसर्ग संवर्धनात प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा असल्याचे सांगीतले. डॉ. रामगावकर यांनी, गोंदिया फेस्टीवलच्या माध्यमातून एकप्रकारे पर्यटन महोत्सवालाचा सुरुवात झाली आहे. जिल्हयाची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. छायाचित्रकार हा हौस म्हणून चित्र काढतो. वन्यजीवाच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून फोटोग्राफी करतो. त्यांचे जीवनपट तो उघड करतो. या बाबी आपण बघत नाही. वन्यजीवांच्या संरंक्षणात छायाचित्रकारांची भूमिका महत्वाची असते. या भूमिकेतून वन्यजीव व वनाच्या संरक्षणात महत्वाचे योगदान मिळत असते असे सांगितले. श्री खानोलकर यांनी, वन्यजीवांचे छायाचित्र काढणे ही एक प्रकारची नशाच आहे. फोटोग्राफीसाठी नियोजन आणि संशोधन आवश्यक आहे. पक्षांचे फोटो काढण्याचा आनंद घेण्यासोबतच त्यांची वागणूक टिपणे हेदेखील तितकेच महत्वाचे आहे. मात्र वेळेचे भान ठेवून ही फोटोग्राफी करणे आवश्यक आहे. फोटोग्राफी वैशिष्टयपूर्ण व्हावी यासाठी मन ओतून काम करणे गरजेचे आहे. पक्षांचे फोटो काढतांना थेट त्यांचेपर्यंत जावू नये. वन्यजीवांचे छायाचित्र काढतांनादेखील आपण त्या प्राण्यांकडे न जाता ते आपल्या जवळ येतील अशापध्दतीने फोटोग्राफी करावी. जिथे आपण फोटोग्राफी करणार आहोत त्या भागातील स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. वर्कशॉपला निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण मिहरे, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादुर तिडके, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी एस.एस.कातोरे व अन्य उपस्थित होते.