लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, वन विभाग आणि गोंदिया- भंडारा जिल्ह्यातील अशासकीय संस्था यांच्यातर्फे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.वन विभाग व व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त वतीने वन्यजीव जनजागृती रॅली भंडारा येथे काढण्यात आली. हिरवळ संस्था गोंदियाच्या सहकार्याने व्याघ्र प्रकल्प शेजारील १५ शाळेत प्रश्नमंजुषा स्पर्धा, वन्यजीवावरील चित्रपट व सापांचे सादरीकरण कार्यक्र म घेण्यात आले. व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेच्या ५० पेक्षा जास्त गावातील शाळांमध्ये रॅली, चित्रकला, निबंध स्पर्धा, वन्यजीव स्पर्धाचे सादरीकरण, स्वच्छता अभियान कार्यक्रम घेण्यात आले.नवेगावबांध पर्यटन संकुल तलाव परिसरात हिरवळ संस्थेचे सदस्य व व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी, कर्मचारी, निसर्ग मार्गदर्शक यांनी स्वच्छता अभियान राबविले. यात जवळपास २०० सदस्य उपस्थित होते. सातपुडा फाउंडेशन गोंदिया यांच्या सहकार्याने मंगेझरी येथे वन्यजीवांविषयी जनजागृती व स्वच्छता अभियान, उमरझरी येथे गाव मे मन की बात, कुºहाडी येथे वन व वन्यजीवांविषयी चित्रकला स्पर्धा, बोळुंदा अधिलोक हायस्कूल व आश्रमशाळा मेंढा येथील विद्यार्थ्यांची निसर्ग भ्रमंती कार्यक्र म घेण्यात आले.नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे व हिरवळ संस्थेतर्फे जिल्ह्यातील एकमेव मंगलम मुकबधीर विद्यालय गोंदिया येथे निसर्ग विषयावर चित्रकला स्पर्धा, राष्ट्रगीताचे गायन व पर्यावरण वाचवा या विषयावरील मुकनाटिका सादर करण्यात आली. यामध्ये शाळेच्या व विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.एम.बी.पटेल महाविद्यालय साकोली येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता फेस पेन्टींग व टी शर्ट पेन्टींग स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ९० मुला-मुलींनी सहभाग घेतला. व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरीडॉर क्षेत्रातील गावांत आययुसीएन अंतर्गत इन्टीग्रेटेड टायगर हॅबीटेट कन्झरवेशन प्रोजेक्ट या प्रकल्पाच्या माध्यमातून काम करणाºया अशासकीय संस्था सृष्टी फाउंडेशन सडक-अर्जुनी यांनीही विविध कार्यक्र म घेतले. एम.बी.पटेल कॉलेज साकोली येथे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदियातर्फे वन्यजीव सप्ताहाचा समारोपीय कार्यक्र म थाटात पार पाडला. यात एम.बी.पटेल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी निसर्ग पर्यावरण वाचविण्याबाबत पथनाटिका सादर केली.यावेळी निसर्ग पर्यावरण व वन्यप्राणी वाचवा हा संदेश देणारे चित्रप्रदर्शन व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. शाळा व महाविद्यालयात वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाबाबत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देवून गौरविण्यात आले.नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे न्यूज लेटर व फुलपाखरु घडी पुस्तिकेचे भंडारा पोलीस अधीक्षक विनिता शाहू यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पोलीस अधीक्षक विनिता शाहू, डॉ. हरिश त्रिवेदी, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक आर.एस. गोवेकर, उपवनसंरक्षक एस. युवराज,विवेक होशींग, साकोली उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, मानद वन्यजीव रक्षक मुकूंद धुर्वे उपस्थित होते.
वन्यजीव सप्ताह विविध कार्यक्र मांनी साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:42 PM
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, वन विभाग आणि गोंदिया- भंडारा जिल्ह्यातील अशासकीय संस्था यांच्यातर्फे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देविविध स्पर्धा : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र