शहरं
Join us  
Trending Stories
1
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
2
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
3
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
4
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
6
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
7
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
9
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
12
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
13
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
14
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
16
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
17
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
18
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
20
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!

शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 5:00 AM

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे असे सांगितले. गोरेगांव तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेले शासकीय धान खरीदी केंद्र सुरु करण्यास उशीर झाल्याने धान खरेदीस विलंब होत होता. खा. पटेल यांच्या निर्देशामुळे  कवलेवाडा, कुऱ्हाडी, दवडीपार येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. कवलेवाडा व कुऱ्हाडी येथे धान खरेंद्री केंद्राचे उद्घाटन खा. पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : कवलेवाडा, कुऱ्हाडी येथे केंद्राचे उद्घघाटन

 लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव :  केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी असून प्रचंड विरोधानंतरही केवळ बहुमताच्या जोरावर तीन कृषी विषयक विधेयक पारित केले. या विधेयकामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा विरोध देशभरातील शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कठीबध्द असून कुठल्याही संकटात आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहू अशी ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.गोरेगाव तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित जनसंवाद व कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी माजी खासदार डाॅ. खुशाल बोपचे, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, रविकांत बोपचे, केवल बघेले, डाॅ. श्रीप्रकाश रहांगडाले, महेंद्र चौधरी, बाबा बहेकार,आनंद बडोले, कल्पना बहेकार, डिलेश्वरी तिरेले, राजेश येरणे, खुशाल वैद्य, भोजू चव्हाण, संजू अगळे, छाया वरकडे, अशोक बघेले, गेंदलाल गौतम, महादेव राणे, बंडू पटले, बी.जी. बघेले, महेंद्र कटरे, गोवर्धन चौधरी, कन्हया कोल्हे, होमेंद्र खोब्रागडे, केशव पटले, खिरेकर, मनोहर ठाकरे उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले राज्यात आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती त्याची पुर्तत: केली आहे. शेतकरी समृध्द व्हावा यासाठी आपले प्रयत्न सुरु असून जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प सुध्दा लवकरच मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे असे सांगितले. गोरेगांव तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेले शासकीय धान खरीदी केंद्र सुरु करण्यास उशीर झाल्याने धान खरेदीस विलंब होत होता. खा. पटेल यांच्या निर्देशामुळे  कवलेवाडा, कुऱ्हाडी, दवडीपार येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. कवलेवाडा व कुऱ्हाडी येथे धान खरेंद्री केंद्राचे उद्घाटन खा. पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेलFarmerशेतकरी