शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
2
"मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
3
कमला हॅरिसनी राजीनामा दिला तरी उपराष्ट्राध्यक्ष पद भारताच्या जावयबापूंकडे राहणार; असे जुळतेय समीकरण...
4
"काहीही झालं तरी जात निहाय जनगणना होणार अन् आरक्षणाची ५० टक्यांची मर्यादा हटवणारच"
5
"मी त्यांना नोटीस पाठवतो"; रामराजेंबाबत अजित पवारांना घेतली कठोर भूमिका, कारण...
6
“...तेव्हा झोपेत होते का, फडणवीसांनी बोलायचा ठेका दिला का”: जरांगेंचा राज ठाकरेंवर पलटवार
7
"सुनील राऊतांना ताबडतोब अटक करा"; निवडणूक अधिकाऱ्याला पत्र; सोमय्यांनी काय म्हटलंय?
8
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
9
बॉलिवूड अभिनेत्रीने अमेरिकेत केलं मतदान, ट्रम्प यांच्या विजयावर नाराजी दर्शवत म्हणाली...
10
भारतीय शेअर बाजारातही चाललं ट्रम्प कार्ड! आयटी क्षेत्रात तेजी, सेन्सेक्समध्ये ९०० अंकांची उसळी
11
याला म्हणतात नशीब! एकाच गावातील २ जण रातोरात लखपती; मालामाल झाले मजूर
12
महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'घड्याळ' चिन्हाबाबत वृत्तपत्रात जाहिरात द्या';अजित पवार यांच्या पक्षाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश
14
“मनोज जरांगे यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदाच होईल”; अजित पवारांनी कसे ते सांगितले
15
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
16
ना विराट, ना रोहित, ऑस्ट्रेलियात 'हा' भारतीय ठोकणार सर्वाधिक धावा; पॉन्टींगची भविष्यवाणी
17
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह
18
लिस्टिंगच्या २० दिवसांतच 'या' शेअरमध्ये २५०% ची वाढ; खरेदीसाठी उड्या, स्टॉकमध्ये विक्रमी तेजी
19
वक्फची शक्ती कमकुवत बनवते, या मुस्लीम वर्गाने केली वक्फ कायद्यापासून बाहेर ठेवण्याची मागणी
20
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल

भाविकांना भौतिक सोईसुविधा लाभतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 10:14 PM

आदिवासी समाजाचे मक्का मदीना समजले जाणारे कचारगड (धनेगाव) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ पौर्णिमेनिमित्त यात्रा १७ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. एक आठवडा चालणारी ही कचारगड यात्रा गोंदिया जिल्ह्यापुरती मर्यादीत नसून संपूर्ण देशातील आदिवासी लोकांच्या श्रध्दा आणि विश्वासाचे प्रतिक आहे.

ठळक मुद्देकचारगड यात्रा १७ पासून : उघड्यावर काढावी लागते रात्र, प्रशासनाने दखल घेण्याची गरज

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : आदिवासी समाजाचे मक्का मदीना समजले जाणारे कचारगड (धनेगाव) येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माघ पौर्णिमेनिमित्त यात्रा १७ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. एक आठवडा चालणारी ही कचारगड यात्रा गोंदिया जिल्ह्यापुरती मर्यादीत नसून संपूर्ण देशातील आदिवासी लोकांच्या श्रध्दा आणि विश्वासाचे प्रतिक आहे. त्यामुळे यात्रेनिमित्त देश विदेशातील आदिवासीबांधव दरवर्षी येथे दाखल होत असतात. मात्र याठिकाणी अद्यापही पायाभूत आणि भौतिक सोयी सुविधांचा अभाव असल्याने भाविकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे यंदा तरी भाविकांना भौतिक सुविधा उपलब्ध होणार का असा उपस्थित केला जात आहे.कचारगड यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना येथे सोयी सुविधा नसल्याने आजही उघड्यावरच रात्र काढावी लागते. निवास, भोजन, शौचालय, पाणी, वीज, प्रवास या समस्यांना सुध्दा तोंड द्यावे लागते. त्यामुळे विकसनशील भारतात आदिवासी समाज किंवा त्यांचे श्रध्दास्थान किती उपेक्षीत आहेत याची प्रचिती येथे आल्यावर होते.आपल्या पूर्वजांची आठवण करीत त्यांची प्राकृतीक स्वरुपात पूजन करण्यासाठी कोयापूनेम (माघ पौर्णिमा) महोत्सवात येणाºया आदिवासी भाविकांची संख्या तीन ते चार लाखाच्यावर असते. आलेले भाविक धनेगाव येथील मुख्य आयोजनस्थळी पोहचतात. त्यानंतर तेथून तीन कि.मी.चा पायी प्रवास पूर्ण करीत पर्वत मार्गाने कचारगडच्या गुफेत प्रवेश करतात.दुसºया पहाडीवर आराध्य देवी देवतांचे निवासस्थान असून माँ काली कंकाली, माता जंगो, बाबा लिंगो यांचे निवास गुफेत असून त्याठिकाणी श्रध्देने नतमस्तक होऊन आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी सुख समृध्दीची प्रार्थना करतात. आपली श्रध्दा आशीर्वादाची झोळी भरत परत धनेगाव यात्रा परिसरात येतात.या दरम्यान प्रत्येक भाविकांचा चार ते पाच तास लागतात. अशात त्यांना थकवा येऊन काही काळ विश्रांती किंवा झोप घेण्याची तीव्र इच्छा असते. परंतु धनेगाव परिसरात भाविकांना विश्रांती घेण्यासाठी कुठे सोय उपलब्ध नाही.संमेलनस्थळी मोठे पेंडाल लावलेले असतात परंतु त्या पेंडालमध्ये सतत कार्यक्रम व भाविकांची व इतर लोकांची रेलचेल सुरु असल्याने विश्रांतीसाठी जागा मिळतच नाही. शेवटी इतर राज्यातून आलेल्या भाविकांना बाहेर उघड्यावर आपले बस्तान मांडावे लागते. कचारगड यात्रेदरम्यान भाविकांना उघड्यावरच रात्र काढावी लागते.धनेगाव कचारगड परिसर घनदाट जंगल व्याप्त परिसर असून हा भाग अतिदुर्गम नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. अशात भाविकांना सुरक्षित स्थळ लाभणे आवश्यक आहे.छावण्यांची सोय व्हावीसध्या प्रयागराज इलाहाबादमध्ये कुंभमेळा सुरु असून त्या ठिकाणी भाविकांसाठी टेंट व छावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कचारगड सुध्दा आदिवासींसाठी सर्वात प्रथम महत्त्वाचे स्थळ असून या ठिकाणी देशाच्या १६-१७ राज्यातील भाविक मोठ्यात संख्येने दरवर्षी भेट देतात. त्यामुळे त्यांच्यासाठी छावण्या अथवा टेंटची व्यवस्था केल्यास मदत होईल.कचारगड यात्रेचे स्वरुप खूप मोठे असून लाखोच्या घरात येणाºया भाविकासाठी भौतिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे आयोजन समितीच्या आवाक्याबाहेर आहे. यासाठी राज्य व केंद्र शासनाने लक्ष देऊन संबंधीत विभागाने पुढाकार घेतल्यास भाविकांची समस्या दूर होवू शकते.- दुर्गाप्रसाद कोकोडे, अध्यक्ष, कचारगड समिती धनेगाव